Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यदातांचा आजार दूर करण्यासाठी ‘हे’ करुन बघा

दातांचा आजार दूर करण्यासाठी ‘हे’ करुन बघा

Teeth Tooth pain,Teeth pain,Tooth pain,Teeth, Tooth, painआईस्क्रीम खाताना दात ठणकतो आणि हात गालाकडे जातो. हे अनेकांनी अनुभवले असेल. तसेच थंड, गोड, गरम पदार्थ खाताना तुम्हालाही नक्कीच त्रास झाला असेल. दात सेन्सिटिव्ह झाल्यामुळे ही समस्या जाणवते. काही उपाय केले तर ही समस्या सुटू शकते.

कोमट पाण्यात दोन चमचे मीठ मिसळा. दररोज सकाळी आणि रात्री या पाण्याने गुळण्या करा. दातदुखीपासून आराम मिळेल.

ब्रश नेहमी योग्य पद्धतीने आणि हळू केला पाहिजे. जास्त वेळ ब्रश करू नये, यामुळे दात घासले जातात.

दातांसोबत जीभदेखील स्वच्छ करावी. यामुळे तोंडाचा वास येत नाही. तुम्ही दात निरोगी ठेवण्यासाठी माउथवॉशदेखील वापरू शकता.

फ्लोराइड असलेला माउथवाॅश किंवा टूथपेस्टचा वापर करावा. खरं तर, फ्लोराइड आपल्या दातांसाठी खूप चांगले असते. यामुळे दात सडत नाहीत.

जंक फूड किंवा शीतपेय टाळले पाहिजे. शिवाय फळांचे रस, व्हिनेगर, रेड वाइन, चहा, आइस्क्रीम यासारख्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. या गोष्टींमुळे दाताचा मुलामा नाहिसा होतो. यामुळे दात पडायला लागतात.

दात घासण्यासाठी नेहमी मऊ टूथब्रश वापरा. यामुळे हिरड्यावर जास्त प्रेशर पडणार नाही. दात घासताना नेहमी हलक्या हाताने घासावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments