Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यटोमॅटोचा वापर केल्याने दूर होतील ‘डार्क’ सर्कल

टोमॅटोचा वापर केल्याने दूर होतील ‘डार्क’ सर्कल

Dark Circles,Dark, Circles,No marksवाढता ताण आणि टीव्ही स्क्रीनसमोर जास्त बसून राहिल्याने डोळ्याच्या खाली डार्क सर्कलची समस्या वाढते. ती एक सामान्य समस्या आहे. आपणही डोळ्यांखाली असलेल्या गडद वर्तुळांमुळे त्रस्त असाल तर टोमॅटोचा वापर करू शकता.

टोमॅटो आणि अॅलोवेरा

१ चमचा टोमॅटोच्या रसात २ टीस्पून अॅलोव्हेरा मिक्स करून डोळ्यांच्या खाली मसाज करा. त्यानंतर अॅलोव्हेरा १५ मिनिटे डोळ्यांखाली लावून ठेवा. आठवड्यातून २ ते ३ वेळेस करा. काही दिवसांतच ही समस्या दूर होईल.

माहीत असू द्या: टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन आणि लायकोपिन असते त्यामुळे त्वचेला नुकसान होत नाही. याबरेाबरच त्वचा मऊ हाेते आणि चमकतेदेखील.

टोमॅटो आणि लिंबू

लिंबू आणि टोमॅटोमध्ये सायट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. दोन्हीचा एक-एक चम्मच रस घ्यायचा. मिक्स करून डोळ्यांखाली लावल्याने काळे सर्कल दूर होते.

महत्वाचे…

टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग आणि व्हाइटनिंग गुण असतात. त्यामुळे त्वचा चमकते. टोमॅटाेमध्ये व्हिटामिन सी असते. यात एस्ट्रिंजेंट गुण असतात. यामुळे काही दिवसांतच काळी वर्तुळे दूर होतात.

टोमॅटो आणि बटाटे

बटाट्याचा रस अँटी-एजिंगचे काम करते. बटाट्याचा रस काढून त्यात टोमॅटोचा रस टाका आणि १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. एक दिवस सोडून तुम्ही हा रस डोळ्यांखाली लावू शकता.

हेदेखील महत्त्वाचे:

टोमॅटोमध्ये असलेले फायटोकेमिकल्स त्वचेच्या मृत पेशी दूर करते. टोमॅटो आणि बटाट्यामुळे त्वचा उजळते. टोमॅटोमध्ये असलेले लायकोपिन त्वचेचे पराबँगनी किरणांपासून बचाव करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments