कोणतंही मंगलकार्य असलं की सगळीकडे कापूर, धूप यांच्या सुगंधाने वातावरण प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं. त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात कापूर हा आवर्जुन वापरला जातो. साधारणपणे कापुराचा वापर धार्मिक कार्यासाठीच होतो असं अनेकांना वाटतं. परंतु, कापराचे अन्यही काही फायदे आहेत.
कापुरामध्ये अनेक शारीरिक समस्यादेखील दूर होता. त्यामुळेच कापुराचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
>>चेहऱ्यावर सतत मुरूम येत असतील तर टी ट्री ऑइल आणि कापूर तेल एकत्र मिसळा. हे मिश्रण मुरुम झालेल्या भागावर लावावा.
>>कापुरामुळे चेहऱ्यावरील सूज, लालसरपणा, त्वचेची जळजळ कमी होते.
>>शरीरावर सतत खाज सुटत असेल तर त्या ठिकाणी कापूराचे तेल लावावे.
>>सतत खोकला येत असेल तर बदामाच्या तेलात ५-६ थेंब कापूराचे तेल मिक्स करुन या तेलाने छातीची मालिश करा.
>>कापूर तेलाचे ४-५ थेंब गरम पाण्यात टाकून त्या पाण्याची वाफ घेतल्यास छातीतील कफ मोकळा होतो.
>>केसांमध्ये उवा झाल्यास खोबऱ्याच्या तेलामध्ये कापूर मिसळून या तेलाने केसांच्या मुळांची मालिश करावी.