skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रखुशखबर: मुंबई पोलिसांना लोकलमधून विनातिकीट प्रवासची मुभा

खुशखबर: मुंबई पोलिसांना लोकलमधून विनातिकीट प्रवासची मुभा

मुंबई : लोकलमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलिसांना लोकलमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई भाजपा शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. 

महिलांना लोकलमध्ये छेडछाडीच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली होती. लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये पोलिस तैनात करुन सुध्दा लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना छेडछाडीचे प्रकार सर्रास सुरुच होते. याला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयासमोर पोलिस विभागातर्फे पोलिसांच्या प्रवासाचा मुद्दा उपस्थित केला. ३० सप्टेंबर २०१७ रोजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या सह रेल्वे बोर्ड आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी यांची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त देखील उपस्थित होते. बैठकीत सुरक्षिततेबाबत चर्चा झाली. यावेळी आयुक्तांनी मुंबई पोलिसांच्या लोकल प्रवासाचा मुद्दा रेल्वे मंत्र्यांपुढे उपस्थित केला. सुरक्षेच्या कारणासत्व मुंबई पोलिसांना लोकलमधून प्रवास करावा लागतो, यामुळे त्यांना विनातिकीत प्रवास करण्याची मुभा असावी, अशी विनंती आयुक्तांनी रेल्वेमंत्र्यांना केली. यानुसार १३ ऑक्टोबर रोजी रेल्वे बोर्डाकडून परिपत्रक काढण्यात आले. यात ‘वर्दीतील मुंबई पोलिसांना मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा आहे’, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे पोलिसांच्या प्रवासामुळे गुन्हेगारांवर वचक बसेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments