हेड : जर्मनीतील हेड शहरात दोन रानडुक्करांनी दोन दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला. यातील एका रानडुक्कराने एका बॅंकवर केलेल्या हल्ल्यात चार लोक गंभीर जखमी झाले होते. त्या रानडुक्करास ठार मारण्यात अखेर पोलिसांना यश आले तर एक रानडुक्कर फरार झाले.
सकाळी नऊच्या सुमारास हेड शहराच्या रस्त्यांवर ही रानडुक्करं फिरताना दिसत होती. या रानडुक्करांचं वजन तब्बल ७० किलो होतं. त्यातील एक रानडुक्कर चष्म्याच्या दुकानात शिरलं. तेथील मालाची या रानडुक्कराने नासधूस केली. नंतर तिथून हे एका बॅंकेतही शिरलं. तिथे रानडुक्कराच्या हल्ल्यामुळे एक माणूस गंभीर जखमी झाला.तर एका माणसाच्या बोटाचा तुकडा पडला. बॅंकेतील एकूण ४ जखमींनी स्थानिक रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. या रानडुक्कराचे सगळे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले. तर टेलिस्कोपच्या माध्यामातून त्याच्यावर लक्षही ठेवण्यात आलं. अखेर या रानडुक्कराला गोळ्या घालून ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले. पण या सगळ्या गोंधळात दुसरे रानडुक्कर शहराच्या बाहेर निसटले.