वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निक्की हेली, सीमा वर्मा यांच्यासहीत प्रशासनातील वरिष्ठ भारतीय अमेरिकी सदस्य तसेच नेतेमंडळी, अधिका-यांसोबत ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. सर्वांमध्ये सहभागी होत ट्रम्प यांची मुलगी इवांकानंही दिवाळी साजरी केली. हेली या संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत आहेत. याशिवाय, यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष अजित पै यांच्यासहीत अनेक दिग्गज यावेळी दिवाळी साजरी केली.
गेल्या वर्षी इवांका दिवाळी सणादरम्यानत वर्जीनिया आणि फ्लोरिडातील मंदिरांना भेट दिली होती. २०१६ मध्ये ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार होते आणि यादरम्यान त्यांनी न्यूजर्सीमध्ये पारंपरिक पद्धतीनं दीप प्रज्वलन केले आणि भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी संबोधित केले होते.
बुश यांनी सुरू केली परंपरा
व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सुरू केली. पण स्वतः त्यांनी कधीही यामध्ये सहभाग नोंदवला नाही. बुश यांच्यानंतर बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात व्हाइट हाऊसमध्ये पारंपरिक पद्धतीनं दीप प्रज्वलन करत दिवाळी साजरी केली.