Thursday, September 12, 2024
Homeमनोरंजनसनी-अरबाज चा 'तेरा इंतजार’

सनी-अरबाज चा ‘तेरा इंतजार’

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा ऑफिशियल टीझर जारी करण्यात आला आहे. हा टीझर रोमान्स आणि सस्पेन्सने भरलेला आहे.

अरबाज आणि सनी एकमेकांवर प्रेम करतात आणि एक दिवस अरबाज अचानक बेपत्ता होते. यानंतर अरबाजचा खून होतो आणि त्याचं कोडं सोडवण्यासाठी सनीचा स्ट्रगल टीझरमध्ये दाखवला आहे. सिनेमात सनी आणि अरबाज यांच्यासह सुधा चंद्रन, सलिल अंकोला, ऋचा शर्मा, गोव्हर खान, हनीफ नोयडा, भानी सिंह आणि आर्य बब्बर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटचा दिग्दर्शन राजीव वालियाने केलं आहे. तर बागेश्री फिल्म्सचे अमन मेहता आणि बिजल मेहता एकत्र या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments