Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeविदेशकॅन्डीमनला हव्या पाच नवीन गर्लफ्रेंड्स!

कॅन्डीमनला हव्या पाच नवीन गर्लफ्रेंड्स!

जगात कोणत्या व्यक्तीच्या आवडी निवडी काय आहेत कुणीही सांगू शकत नाही. परंतु काही मोजकेच बोटावर मोजण्या इतके लोक असतात जे की, आपल्या आवडी निवडी बाबत बिनधास्त बोलतात. आता समाजात वारतातही. अशी एक व्यक्ती आहे ती म्हणजे कॅन्डीमन नावाने ओळखला जाणारा तंबाखू सम्राट ट्रॅवर्स बेनॉन. याला पाच नवीन गर्लफ्रेंड्स हव्या आहेत. त्याने आपल्या नवीन गर्लफ्रेंडच्या शोधात एक जाहिरात सुद्धा दिली. गर्लफ्रेंडने माझी एक पत्नी आणि दोन गर्लफ्रेंडसोबत बंगला शेअर करण्याची तयारी दाखवावी लागेल. असे त्याने म्हटले आहे. ब्रिटिश दैनिक द सनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितल्याप्रमाणे, मास्टर बेडरुममध्ये पाच आणखी गर्लफ्रेंड राहू शकतील इतके मोठे बेड बनवण्यात आले आहे. यासाठी त्याने जाहिरात सुद्धा दिली आहे.
४६ वर्षीय कॅन्डीम आणखी काय म्हणतो..

चार मुलांचा बाप ४६ वर्षीय कॅन्डीम सध्या पाच नवीन प्रेयसींच्या शोधात आहे. ब्रेकफास्ट करणे, सोबत फोटोज काढणे आणि वाइल्ड फँटेसी पूर्ण करण्यास तयार राहावे लागेल असे तो म्हणतो.
जाहिरातीनुसार,गर्लफ्रेंड होऊ इच्छिणाऱ्या तरुणीकडे डिझायनर कपडे,अॅक्सेसरीज,जगभरातील फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये फिरणे,महागड्या कार आणि ज्वेलरी घालून रिलॅक्स करण्याची आणि प्रायव्हेट जेटसह आलीशन बंगल्यात जगण्याची संधी आहे. नेहमीच मेक-अपमध्ये राहणे, फिगर आणि कपड्यांसह ग्लॅमरस स्टाइल मेंटेन करणे आणि हवे तेव्हा पूलमध्ये येऊन रिलॅक्स करणे अशी अपेक्षा त्याला एका गर्लफ्रेंडकडून आहे.
या सर्वांना रात्री कॅन्डीमनच्या मास्टर बेडरुममध्ये एकाच बेडवर झोपावे लागेल. हा बेड तीन मोठ्या पलंगांना जोडून तयार करण्यात आला आहे. सध्या तो हा बेड पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत शेअर करतो.

कॅन्डीमनचा बंगलाच न्यारा
४६ वर्षीय कॅन्डीमॅनचा बंगला गोल्ड कोस्टमध्ये असून त्याने २०१० मध्ये २४ कोटी रुपयांत विकत घेतले होता. यानंतर त्याने आपल्या पार्ट्यानुसार घरातील इंटीरिअर बदलले.
बंगल्याचा प्रवेशव्दार लाकडी असला तरीही त्यावर सोन्याचा मुलामा आहे. प्रवेश करताच महागड्या कलाकृती दिसून येतात. पंधरा बेडरूम आणि एकोणावीस बाथरुमच्या या बंगल्यातील स्वीमिंग पूलला देखील सोना चढवण्यात आला आहे. यातील सिनेमा हॉल आणि चक्क भिंतींवर सुद्धा ठिक-ठिकाणी सोन्याच्या कलाकृती आहेत. सोबतच सोन्याने मढलेल्या वॉर्डरोबमध्ये ब्रँडेड कपडे आणि शूजसह अॅक्सेसरीज भरल्या आहेत.
त्याच्या घरातील कार आणि बाइकसह अनेक वस्तूंवर त्याचा नावाचा आणि कंपनीच्या नावाचा लोगो आहे.
दोन वर्षांपूर्वीच त्याने आपल्या घराच्या रिनोव्हेशनसाठी एक कोटी अमेरिकन डॉलर खर्च केले. तसेच स्वीमिंग पूल आणि गार्डनला नवीन आकार दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments