यु.एस. – ऑनलाईन साईट्सवरून विविध वस्तू मागविण्याचा फॅड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामध्ये ग्राहकांची फसवणूकही होत आहे. एका महिला ग्राहाकाने ऑनलाईन आयफोन ६ मागविला आणि तिला मिळाले चक्क बटाट्याचे चिप्स. यामुळे त्या महिलेला धक्काच बसला.
मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवल्यावर साबणाच्या वड्या, चिप्स असे पदार्थ डिलिव्हर झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन वस्तू मागवल्यावर आधी आपण बॉक्समध्ये काय आहे हे तपासून घेतो, आणि मगच पुढचा व्यवहार करतो. पण जर एका स्टॉलवरून आयफोन ६ खरेदी केल्यावर घरी आल्यानंतर ते बटाटे आहेत असं समोर आलं तर आश्चर्य वाटेल ना. पण युएसमध्ये असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.