Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपुन्हा बंदुकगिरी करणाऱ्या महाजनांची हकालपट्टी करा- मलिक

पुन्हा बंदुकगिरी करणाऱ्या महाजनांची हकालपट्टी करा- मलिक

जळगाव : जळगावात नरभक्षक बिबट्याच्या शोधमोहिमेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची बंदूक बिबट्याला मारण्यासाठी काढली. कायद्याने हा प्रकार चुकीचा असून त्यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

महाजन आणि बंदूक वाद हा काही नवीन नाही. पूर्वीही त्यांनी एका राजकीय सभेमध्ये कंबरेवर लावलेली बंदूक सर्वांना दिसेल अशा प्रकारे कंबरेला लावून भाषण दिले होते. आता बिबट्याला मारण्यासाठी त्यांनी बंदूक हातात धरुन जीव धोक्यात घातला होता. जळगावातील चाळीसगाव तालुक्यात वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम सुरु होती. यावेळी नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत मंत्री गिरीश महाजनही सहभागी झाले. महाजनांच्या हाती चक्क बंदूक पाहायला मिळाली.

बिबट्या नरभक्षक झाल्याने त्याला मारण्याचे आदेश सरकारने दिल्याचं महाजन यांनी म्हटलं. मात्र बिबट्या आढळून आला नाही.वनाधिकारी असताना गिरीश महाजनांनी स्वतःचा जीव धोक्यात का घातला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments