बीजिंग –चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्वात मोठे लष्कर असलेल्या चीनच्या सैन्य दलात २३ लाख जवान आणि अधिकारी आहेत.
चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने नुकतेच झालेल्या काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांना दुसऱ्यांदा देशाचा आणि पक्षाचा नेता निवडले आहे. भारतासाठी शी जिनपिंग यांचे लष्कराला दिलेले आवाहन लक्षवेधी ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला ७२ दिवसांचा डोकलाम वाद संपुष्टात आला आहे. चीनने हा वाद शांतता चर्चेतून सुटल्याचे सांगितल्यानंतरही राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्जा राहण्याचे आवाहन केले आहे.