Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्र‘त्या’ सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास मनाई

‘त्या’ सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास मनाई

नवी मुंबई : मुंबई मनपामधील सात पैकी सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास कोकण विभागीय आयुक्तांनी मनाई केली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आता सहा नगरसेवक मनसेत आहेत. त्यामुळे आता पक्षाचा व्हीप मानावा लागणार आहे.

मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी दिवाळीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सहा नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मनसेने दाखल केली. त्यावर सुनावणी करताना कोकण आयुक्तांनी याचिका दाखल करून घेतली. मात्र याचिकेतील कामकाजात सहभागी होऊ न देण्यांची मागणी मात्र फेटाळण्यात आली.

हे सर्व जण पालिकेचे निवडून आलेले सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना इमारतीत येण्यापासून रोखणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केलेय. या नगरसेवकांचे कामकाज सहभागी होण्याचा अधिकारी अबाधित ठेवण्यात आले आहेत. दरम्यान कोकण आयुक्तांच्या निर्णयाचा सहाही नगरसेवकांच्या सद्यस्थितीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. तर सेनेत गेलेले नगरसेवक मनसेचेच असल्याचा दावा मनसेनं केलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments