महत्वाचे…
१. लैंगिक शोषणच्या प्रकरणात सगळी संपत्ती २.बिक्रम योगा स्टुडियोच्या ७०० फ्रॅंचायजीचा मालक होता ३. मॅडोना, डेमी मूर, बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लूनी यांसारखे हॉलिवूड, स्पोर्ट आहेत फॉलोअर्स
अमेरीका-जगभरात हॉट योगासाठी प्रसिद्ध असलेले योगगुरु बिक्रम चौधरी सध्या माध्यमांत चर्चेचे विषय ठरलेले आहेत. बिक्रम यांना अमेरिकीच्या न्यायालयाने दिवाळखोरीत घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याबाबत योगगुरुचे म्हणणे आहे की, पिडीतांना देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे योगगुरुला दिवाळखोर घोषित करावे. या रंगेल योगगुरुची सगळी संपत्ती लैंगिक शोषणच्या प्रकरणात जप्त करण्यात आली आहे.
५०० कोटींची होती योगगुरुची संपत्ती
– बिक्रम आतापर्यंत बिक्रम योगा स्टुडियोच्या ७०० फ्रॅंचायजीचा मालक होता.
– त्यांची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपयांची होती. याचे सगळे हक्क न्यायालयात केस हरल्यानंतर वकिलाकडे गेले आहेत.
– ७० वर्षाचा भारतीय अमेरिकेत बिक्रम योगाचे संस्थापक आहेत. संपूर्ण जगभरात ते हॉट योगासाठी प्रसिद्ध
– २२० देशांत त्यांचे ७२० योगा स्कूल आहेत. यापैकी डझनभर योगा स्कूल ब्रिटनमध्ये आहेत.
– त्यांच्या फॉलोअर्समध्ये मॅडोना, डेमी मूर, बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लूनी यांसारखे हॉलिवूड, स्पोर्ट आणि राजकारणातील हाय प्रोफाईल सेलिब्रिटीजचा समावेश आहे.
– बिक्रम यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप होता. २०१३ पर्यंत त्यांची वकील मीनाक्षीसह सहा महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते.
– वकील मीनाक्षी हिने २०१५ मध्ये बिक्रम यांच्या विरूद्ध अमेरिकन न्यायालयात तक्रार दाखल केली होती. प्रकरणाची सुनावणी जानेवारी २०१६ मध्ये पूर्ण संपली. त्यानंतर बिक्रम यांची सगळी संपत्ती मीनाक्षी यांच्या नावे करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.
पत्नीले घेतलाय घटस्फोट
– त्यांची पत्नी राजश्री प्रसिद्ध योगा टीचर आहे. तिने बिक्रमवर सुरु असलेल्या आरोपाला कंटाळून घटस्फोट दिला.
– ३२ वर्षाच्या राजश्री चौधरीने डिसेंबर २०१५ मध्ये बिक्रम चौधरी यांच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
– तिने ५०० कोटीच्या संपत्तीत वाटा मागितला होता.
– मात्र कोर्टाने वकील मीनाक्षी हिच्या नावावर सर्व संपत्ती केली आहे.
– त्याचबरोबर ४३ आलिशान कारसुद्धा मीनाक्षीच्या नावे करण्यात आल्या आहेत.
कोण आहेत बिक्रम योग?
– बिक्रम चौधरी आपल्या फॉलोअर्सला ४० डिग्री तापमानातदेखील योगा शिकवतात. त्याला हॉट योगा असे नाव आहे.
जगभरात ५०० फ्रॅंचायजी आहेत.
– फोर्ब्सनुसार, बिक्रम एका ट्रेनिंग सेशनसाठी १० हजार डॉलर घेतात. २० हजार डॉलर वैयक्तिक ट्रेनिंगसाठी मोजावे लागतात.