स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
या गुंतवणुकीमुळे राज्यातील किमान १०,००० लोकांना थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “गुंतवणूकदार त्यांच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी लवकरच मुंबईला भेट देतील. आमचे सरकार गुंतवणूकदारांच्या सर्व मागण्या वेळेत पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे; आम्ही उद्योग समर्थक आहोत, लोकाभिमुख आहोत. दावोसमध्ये अवघ्या २ दिवसांत १.३४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे .”
“सबसिडी, उत्तम पायाभूत सुविधा आणि जलद मंजुरी यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा वरचढ ठरते. डेटा सेंटर्स, लॉजिस्टिक, फार्मा आणि अक्षय ऊर्जा ही महाराष्ट्रासाठी वाढीची नवीन क्षेत्रे आहेत,” असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “जागतिक गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, चांगल्या पायाभूत सुविधा, व्यवसायाचे वातावरण आणि सरकारी समर्थन यामुळे आकर्षित झाले आहेत.”
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दावोस येथे दाखल झाले असून त्यांनी दावोस येथे तयार केलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी प्रदर्शन करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या उद्योगांशीही येथे सामंजस्य करार केले जातील.”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आणि त्याद्वारे सुमारे १०,००० तरुणांना काम मिळेल,” असे सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या व्यतिरिक्त प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
Web Title: World Economic Forummadhye Maharashtracha pahilya divashi 45,000 kotincha samanjasya karar