रियाध – महिलांसाठी पृथ्वीवरील नरक समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात परिवर्तनाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजे मोहम्मद बिन सलमान यांनी देशातील स्टेडियमची दारे महिलांना खुली करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी जून महिन्यांपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
राजे मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीचे आधुनिककरण करण्याचा दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलण्यास सुरवात केली आहे. या निर्णयामुळे महिलांना थेट स्टेडियममध्ये जावून परिवारासोबत क्रीडा स्पर्धांचा आनंद लुटता येणार आहे. सौदीतील महिलांवर अजूनही अजूनही कठोर बंधने कायम आहेत. यात ड्रेस कोडसोबत अनोळखी पुरुषाबरोबर बाहेर फिरायला जाण्यास बंधने घालण्यात आली आहेत. जर तातडीच्या वेळेस गरज भासल्यास त्यावेळी पालकांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे.