क्वेट्टा | पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे पोलिसांच्या ट्रकजवळ झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २२ जण जखमी झाले असून अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
क्वेट्टामधील सिबी रोड येथे बुधवारी सकाळी एका कारमध्ये स्फोट झाला. याच दरम्यान तिथून स्थानिक पोलिसांचा ताफा जात होता. हा स्फोट एवढा भीषण होता की चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या स्फोटात २२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकमध्ये क्वेट्टा पोलिसांच्या शीघ्र कृती दलातील ३० कर्मचारी होते.