जयपूर : गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बाबांचे कारनामे बाहेर येत आहेत. आता राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक बाब समोर आलीये. अनैतिक संबंधाच्या आरोपाला कंटाळलेल्या एका बाबाने स्वत:च स्वत:चे लिंग कापण्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्याची स्थिती गंभीर झाल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, चुरूच्या तारानगरमध्ये राहणा-या या बाबाचे नाव संतोष दास आहे. नागरिकांनी गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप केला होता. त्यामुळे हैराण झालेल्या संतोषदासने स्वत:च स्वत:चे लिंग कापले. असह्य वेदना होत असल्याने बाबाला कुटियाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, ‘बाबाच्या शरिरातून खूप जास्त रक्त गेलंय. आता त्याला बीकानेरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. आम्ही अजूनही त्यांची साक्ष घेऊ शकलो नाही. त्यांच्या शेजा-यांनी त्यांच्यावर अनैतिक संबंध असल्याचा आरोप लावला होता. त्यासोबतच गाव सोडून जाण्यासही सांगितले होते.