skip to content
Sunday, May 19, 2024
Homeविदेशट्रम्प यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा "घृणास्पद" - निक्की हॅले

ट्रम्प यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा “घृणास्पद” – निक्की हॅले

लंडन – संयुक्त राष्ट्र संघाच्या अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना “घृणास्पद” आणि “अत्यंत आक्षेपार्ह” म्हटले आहे.

‘वुमन रुल’ या पोडकास्टमध्ये बोलताना हॅले म्हणाल्या, की “सक्षम महिलांना अशा अफवांना सामोरे जावे लागते. या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर, माझ्या लक्षात आले आहे, की जर आपण खरे बोलत असू, आणि आपल्या म्हणण्यावर ठाम असू तर काही लोकं अशी असतात ज्यांची मनं यामुळे दुखावतात. अशी लोकं आपले अस्तित्व संपवण्याचा प्रसत्न करतात.”
फायर अॅण्ड फ्युरी: इनसाइड ट्रम्प व्हाईट हाऊस या पुस्तकाचे लेखक मिशेल वोल्फ यांनी ट्रम्प यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. यानंतर निक्की हॅले यांचे ट्रम्प यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत अशा चर्चा सुरु झाल्या. साऊथ कॅरोलीन प्रांताच्या राज्यपाल असतानासुद्धा हॅले यांना अशाच अफवांना सामोरे जावे लागले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments