Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमाजी आमदार चंद्रकांत जगताप यांचे निधन

माजी आमदार चंद्रकांत जगताप यांचे निधन

पुणे – विधानपरिषदेचे माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, सहकार महर्षी चंद्रकांत निवृत्ती जगताप (वय ७०) वर्षे यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दिवंगत आमदार रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विधानपरिषदेवर जगताप हे निवडून आले होते. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही काम केले होते.
चंद्रकांत जगताप यांनी पुरंदर तालुक्यात शैक्षणिक संस्था, संत सोपानकाका सहकारी बँकेच्या राज्यात विविध ठिकाणी शाखा काढल्या आहेत. तसेच, पुरंदर नागरी पतसंस्थेच्या विविध शाखांची स्थापना, दूध संस्था आदींची स्थापना केली असल्याने ते सहकार महर्षी म्हणून परिचित होते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात काँग्रेस आय पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी काम केले. ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणून ओळखले जात होते. सध्या पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहेत.

पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे पुत्र. चंद्रकांत जगताप यांच्यावर सासवड येथे आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments