Friday, July 19, 2024
HomeUncategorizedदाट धुक्यामुळे भीषण अपघातात १३ जण ठार

दाट धुक्यामुळे भीषण अपघातात १३ जण ठार

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये दाट धुक्यामुळे  मंगळवारी रात्री एक भीषण अपघात  झाला. जलपाईगुडीतील धुपगुडी भागात झालेल्या भीषण अपघातात तब्बल १३ जण ठार झाले तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक जण जखमी देखील झाले आहे. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा एक डंपर मयनातलीकडे जात होता. दरम्यान, दृश्यमानता कमी झाल्यामुळे डंपरने अनेक वाहनांना धडक दिली. ज्यामध्ये १३ जण ठार झाले. दरम्यान, या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

विवाह समारंभातून आपल्या घरी परतत असताना झाला अपघात

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलीस सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, या अपघातात बळी पडलेले लोक एका विवाह समारंभातून आपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातानंतर अनेक स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला आहे हे अद्याप तरी सांगता येणार नाही. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात दृश्यमानता कमी असल्यामुळे झाला असावा. पण सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments