Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
HomeUncategorized‘आयटम नंबर्स’साठी करण जोहरने मागितली माफी!

‘आयटम नंबर्स’साठी करण जोहरने मागितली माफी!

चित्रपटातील आयटम साँगवर प्रेक्षकांच्या उड्या पडतात. पण इंडस्ट्रीतल्याच काही ज्येष्ठ कलाकारांना चित्रपटातील हे आयटम साँग अजिबात मान्य नाहीत. जया बच्चन, हेमा मालिनी, शबाना आझमी, जावेद अख्तर आदींनी आयटम साँगला विरोध केला आहे. आता या यादीत दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता करण जोहरचे नावही जुळले आहे. आता तुम्ही म्हणाल, करणच्या स्वत:च्याच चित्रपटात आयटम साँग प्रेक्षकांनी पाहिलेय, मग? होय, करणच्या काही चित्रपटात आयटम साँग होते. पण करणला आता इतक्या वर्षांनंतर या गोष्टीचा पश्चाताप होतोय. यासाठी त्याने माफीही मागितली आहे. शिवाय यानंतर माझ्या कुठल्याच चित्रपटात आयटम नंबर असणार नाही, असे म्हटले आहे.
अलीकडे एका मुलाखतीत करणने याबद्दलचे मत बोलून दाखवले. इंडस्ट्रीने पडद्यावर दाखवल्या जाणाºया गोष्टींबद्दल सतर्क असायला हवे. माझ्या चित्रपटातील आयटम नंबर्सबद्दल मी माफी मागतो. ही चूक माझ्याकडून पुन्हा होणार नाही. दिग्दर्शक . निर्माता या नात्याने माझ्याकडून ही चूक झाली आहे, असे करण यावेळी म्हणाला. ‘She The Peopl’ने आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात करण माफी मागताना दिसतोय.
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या ‘अग्निपथ’ आणि ‘ब्रदर्स’ या चित्रपटात आयटम नंबर्स होते. ‘अग्निपथ’मधील ‘चिकनी चमेली’ या आयटम नंबरवर कॅटरिना कैफ थिरकताना दिसली होती. तर ‘ब्रदर्स’मधील ‘मेरा नाम मैरी है’ या गाण्यावर करिना कपूर थिरकली होती. पण आता यापुढे करणच्या कुठल्याच चित्रपटाला आयटम साँगचा तडका नसणार आहे. या बातमीने अनेक जण नाराज  होणार असले तरी करण आणू पाहत असलेला ट्रेंड निश्चितपणे प्रशंसेस पात्र आहे.
अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना मिळणा-या कमी मानधनाच्या मुद्यावर करण यावेळी बोलला. इंडस्ट्रीत हळूहळू बदल होत आहेत. सगळे बदलते आहे. येणारा काळ हा कन्टेन्टचा आहे. शाहरूखचा चित्रपट शेकडो कोटी कमवत असेल तर त्याला त्या तुलनेत मानधन मिळते. अभिनेत्रींचे चित्रपटही इतके कोटी कमावू लागल्यावर निश्चितपणे त्यांनाही त्या तोडीचेच मानधन मिळेल, असे तो म्हणाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments