Friday, December 6, 2024
Homeमुख्य बातम्यालोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे?

लोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे?

raj thackeray, ठाकरे, राज ठाकरे

कुठल्याही राज्यातील लोक आपली अड़चण असेल तर ती सोडविण्यासाठी सत्तेवर असलेल्या मंत्रीकड़े किंवा मुख्यमंत्रीकड़े जात असतात, जर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर विरोधीपक्ष नेत्यांकडे जातात, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिण्यापासुन एक वेगळेच चित्र सर्वाना बघायला मिळत आहे ते म्हणजे श्याडो कैबिनेट राज ठाकरे यांच्या रुपात.

राज ठाकरे हे नेहमी पद्धतशीर आणि काटेकोरपणे काम करण्यासाठी अधिक जाणले जातात, मी पत्रकार म्हणून त्यांच्या बाबतीत एक गोष्ठ नक्की सांगू शकतो ती म्हणजे लोकांचे काम करण्याची त्यांची कसब आणि कामात वेळेची किंमत ही होय, आज संपूर्ण महाराष्ट्रातुन लोक राज ठाकरे यांच्याकडे आपली अड़चण घेऊन जात आहेत, त्यांना आपले काम होण्याची फक्त वारंटी नाही तर ग्यारेन्टी सुद्धा मिळत आहे, त्यांच्याकडे काम घेऊन गेलेले लोक आत्मविश्वासाने बाहेर येतांना सुद्धा दिसत आहेत त्याचे कारण म्हणजे राज ठाकरे त्यांना आपले काम किती दिवसात होईल हे सुद्धा सांगून टाकतात, मग लोकांना ह्यापेक्षा अधिक काय पहिजे असते.

आज त्यांच्याकडे डॉक्टर, कोळी, डबेवाले,पुजारी, जिम मालक, कलाकार अश्या अनेक घटकातील लोक जात आहेत आणि ह्यापैकी अनेक लोकांचे वेळेत काम सुद्धा झाले आहे, हे चित्र आज संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे म्हणून लोक सत्तेवर असलेल्या लोकांकडे जाण्यापेक्षा कृष्णकुंज वरती जाणे पसंद करीत आहेत, हे सर्व बघता सत्तेवरील काही लोकांना कृष्णकुंजकड़े वाढलेला लोकांचा कल पसंद येत नाही आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली त्यांना जाणवत आहे.

आज लोकांना आपला माणूस म्हणून राज ठाकरे का आवडत आहेत? भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून जनता त्यांना बघत तर नसेल ना? असे एक अनेक प्रश्न मनात येत आहेत, या बाबत अनेक लोकांशी बोलणे झाल्यावर हे समजले की आज सत्तेवर असलेली बरीच लोक फक्त शब्द देण्यापलीकडे कामे करीत नाहीत, जी कामे होत आहेत त्यांच्या वेळेची कोणतीही मर्यादा नाही, काम होईलच याचीही ग्यारेन्टी नाही, मंत्री वेळेवर भेटत नाहीत, पीए नावाच्या व्यक्तीचे पाय धरावे लागतात तेंव्हा कुठे मंत्री मोहोदय यांच्याशी भेट किंवा बोलणे होते, म्हणून ही सर्व कसरत करत करत त्या माणसाची ईच्छाशक्ती संपते आणि कंटाळून तो काम सोडून देतो आणि मग जेंव्हा त्याला लोकांच्या माध्यमातून हे कळते की महाराष्ट्रात प्रति सरकार उदयास आले आहे आणि त्या माध्यमातून लोकांची कामे होत आहेत त्या परिस्थितीत तो मनुष्य आणि संघटना सकारात्मक विचार करून कृष्णकुंजकड़े धाव घेतात आणि काम करूनच परत येतात.

राज ठाकरे कोणत्या योजनाबद्ध पद्धतीने लोकांची कामे करुन देतात हे लोकांना माहित जरी नसले तरी ते लोकांसाठी महत्वाचे नाही, आपली समश्या जलद गतीने सूटते आहे ना हे अधिक महत्वाचे आहे, गरीब, मध्यमवर्गीय, पीड़ित, शोषित,जनतेला अजुन काय हवे आहे, जनतेला आपल्यां नेत्यांकडून एकच अपेक्षा असते ती म्हणजे माझा नेता हा मला पाहिजे त्या वेळेत उपलब्ध असावा आणि माझी अड़चण तात्काळ सोडविणारा असावा म्हणून आज महाराष्ट्रातील जनता प्रति सरकार आणि माझा नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकड़े बघते आहे.

– चंदन पवार


Web Title: Why do people think their problems would be solved only at Krishna Kunj?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments