Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय...

सरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…

महाराष्ट्रातील मंत्री आणि खुद्द आरोग्यमंत्रीचा खाजगी हॉस्पिटलवर विश्वास, आम आदमीला सोडले सरकारी सडलेल्या व्यवस्थेच्या हवाली

सरकारी हॉस्पिटल, nair hospital, government hospital, rajesh tope

आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला असतांना महाराष्ट्रातील  मंत्री लोकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यात कमी पडत आहेत, आज सरकारी हॉस्पिटलची अवस्था खूप मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे, उच्च  दर्जाची इन्स्ट्रुमेंट्स, आधुनिक मशिन्स चा अभाव आणि स्वच्छतेच्या नावाने ओरड चालू आहे, कर्मचारीची रुग्णांप्रती हेडसाळ करीत आहेत, जसे की कर्मचारी आपल्या पैश्यातून रुग्णांची सेवा करण्याची भावना निर्माण करीत आहेत, सर्वत्र दुर्गंधी, काही सरकारी डॉक्टरांची पाट्या टाकण्याची वृत्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे छुपी लूट होत आहे.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी हॉस्पिटलची अवस्था बघितली तर कोरोना रुग्ण ठासून भरलेले दिसत आहेत, एकाच बेडवर दोन दोन रुग्ण, बेड नाहीत म्हणून जमिनीवर ईलाज, जर महाराष्ट्राच्या मंत्र्यांची लोकांप्रती सेवाभाव राहिला असता तर आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना हॉस्पिटल निर्माण झाली असती, हे सर्व असतांना सुद्धा लोकांचा सरकारी हॉस्पिटलवर आणि तेथील व्यवस्थेवर थोडासा विश्वास होता परंतु दस्तुरखुद्द महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जर कोरोनाचा ईलाज फोट्रीस सारख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये घेत असतील तर सामान्य माणूस सरकारी हॉस्पिटलवर कसा विश्वास ठेवेल, आज मध्यमवर्गीय माणसाकडे पैसे नाहीत म्हणून मजबुरीने त्याला सरकारी हॉस्पिटल मध्ये डोळे बंद करून ऍडमिट व्हावे लागते आहे.

लोकांचा सरकारी हॉस्पिटलवरचा विश्वास दृढ होईल म्हणून महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याने किंवा लोकप्रतिनिधीने कोरोना झाल्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये   ईलाज घेतला नाही, आज एकाही मंत्र्याने उदाहरणांसाठी असा त्याग केलेला नाही, सभा समारंभ मधून मोठमोठ्या गप्पा करणे सोपे असते, सरकार तुमच्यासाठी आहे, आरोग्य व्यवस्था उच्च दर्जाची आहे मग तुम्ही का सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले नाहीत हा प्रश्न अनुउत्तरीत आहे.

आज पर्यंत कोणी कोणत्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना किंवा अन्य आजारासाठी ईलाज घेतला त्यांची नावे

  • शरद पवार- ब्रीच कॅन्डी
  • अजित पवार- ब्रीच कॅन्डी
  • राजेश टोपे- फोर्तीस
  • एकनाथ खडसे- बॉम्बे हॉस्पिटल
  • अशोक चव्हाण-ब्रीच कॅन्डी
  • जितेंद्र आव्हाड- फोर्तीस
  • दादा भुसे-ब्रीच कॅन्डी
  • देवेंद्र फडणवीस- सेंट जॉर्ज
  • धंनजय मुंडे- -ब्रीच कॅन्डी
  • अस्लम शेख-ब्रीच कॅन्डी
  • अब्दुल सत्तार-ब्रीच कॅन्डी
  • सुनील केदार-ब्रीच कॅन्डी

आणि आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अर्धांगिनी रश्मी ठाकरे एच एन रिलायन्स मध्ये ऍडमिट झाल्यात.

नेते आणि मंत्री यांच्या अश्या वागण्यामुळे खरंच महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटलमधील अवस्था ईलाज करण्यासारखी नाही का हा प्रश्न निर्माण झाला आहे? यापुढे सामान्य लोकांनी सरकारी हॉस्पिटलवरती विश्वास ठेवायचा की नाही हे महाराष्ट्रातील लोकांना सांगावे लागेल.

सरकारी हॉस्पिटल सुद्धा उच्च दर्जाची होऊ शकतात याचे उच्चकोटीचे उदाहरण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखवून दिले आहे, पण महाराष्ट्राची आत्ताची स्थिती खूपच धक्कादायक आहे.

– चंदन पवार
सामाजिक कार्यकर्ता

Web title: The Maharashtra government does not trust government hospitals

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments