Sunday, April 28, 2024

हे राम!

राम, hey ram

अयोध्या राममंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याची बातमी कानावर येताच पायाखालची जमीनच सरकली कारणही तसेच आहे, काही राजकिय नेते सरकारी कामात मोठमोठ्या योजनांच्या नावाखाली महाभ्रष्टाचार करतात, परंतु त्यांच्या दुष्टतेची नजर मंदिराच्या कामातही लागेल हे बघून मोठ्या कष्ठतेने हे राम! असेच मुखातून निघते आहे.

देवाच्या बाबतीत आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो कधी देवाच्या निरादराची बातमी, कधी मंदिर तोडल्याची तर कधी देवाची सोन्याची मूर्ती, दागिने चोरल्याची बातमी यातून एक लक्षात येते की माणूस नावाचा प्राणी आता देवालाही घाबरत नाही, त्याने त्याचे हृदय एव्हडे दगडाचे करून घेतले आहे की देवासाठी खरेदी केलेल्या जमिनीचा सुद्धा घोटाळा करून टाकल्याचा आरोप झाला आहे, हे जर सत्य असेल तर कलियुगाचा अंत माणूस म्हणून हे राजकारणी लवकरात लवकर करीत आहेत.

नेमके काय प्रकरण आहे?

समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार तेजनारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी आरोप केलेत की “राममंदिरासाठी 2 कोटी रूपयांनी खरेदी केलेली जमीन काही मिनिटातच 18.5 कोटी रूपयांमध्ये पुन्हा खरेदी केली गेली.”रामजन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी हे आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत खोडून काढले आहेत. माध्यमांना दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटलं आहे की “श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जेवढी जमीन विकत घेतली आहे तिची किंमत खुल्या बाजारातल्या किमतीपेक्षा खूप कमी आहे.”

समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की ज्या दिवशी जमिनीचं कोटी 2 रूपयांचं विक्रीखत झालं त्याच दिवशी त्या जमिनीचं 18.5 कोटी रूपयांचं अग्रीमेंट झालं. पांडे यांनी आरोप केलाय की राममंदिरासाठी जमीन खरेदी करण्याच्या बहाण्याने रामभक्तांची फसवणूक केली जातेय. त्यांचा दावा आहे की हा सगळा प्रकार महापौर आणि ट्रस्टी यांना माहिती होता. पवन पांडेंनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.त्यांनी पत्रकार परिषदेत रजिस्ट्रीची कागदपत्रं दाखवली आणि म्हणाले, “राम जन्मभूमीच्या जमिनीला लागून असणारी एक जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्चला संध्याकाळी सुल्तान अन्सारी आणि रवी मोहन यांना 2 कोटी रूपयांना विकली होती. तीच जमीन काही मिनीटातच चंपत राय यांनी रामजन्मभूमी ट्रस्टकडून विकत घेतली. मी म्हणतोय यात भ्रष्टाचार झाला आहे. असं काय घडलं की 10 मिनिटात जणू काही जमिनीतून सोनं उगवलं आणि तिची किंमत इतकी वाढली?”

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की रामाच्या नावावर जी जमीन विकत घेतली जातेय त्यात भ्रष्टाचार होतोय. त्यांचं म्हणणं आहे की, “सेकंदाला 5.5 लाख अशा गतीने जमिनीची किंमत वाढलीये. जगातल्या कुठल्याही जमिनीची किंमत इतक्या वेगाने वाढली नसेल. या प्रकरणाची तात्काळ ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मी मागणी करतोय. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना अटक व्हायला हवी.”

हे आरोप फारच गंभीरतेने घेतलेत आणि जर यात काही तथ्य आढळलं तर याविरोधात आंदोलन केलं जाईल यात शंका नाही, परंतू असे होण्यावाचून सरकार का रोकू शकत नाही ? की सरकारच्या आशीर्वादानेच हे सर्व काही चालू आहे असाही संशय व्यक्त करण्यास वाव आहे? देश्याच्या लोकांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या राममंदिर ट्रस्ट च्या बाबतीत असे होत असल्यामुळे भारतीयांचे हृदय अशांत जरूर झाले आहे, जो पर्यंत ह्या प्रकरणावर सोक्ष मोक्ष लागत नाही तोपर्यंत लोक राममंदिर ट्रस्ट च्या कारभारावर कसा विश्वास ठेवणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे, ह्या सर्व प्रकरणावर भाजपा सरकारने तात्काळ चौकशी चालू केली पाहिजे जेणेकरून लोकांच्या मनात गेलेला संशय लवकर मिटेल आणि धर्माच्या कामात निःसंशय काम अविरत चालू राहील.

– चंदन पवार


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments