Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखडॉ. लागू अभिनयाचे विद्यापीठ!

डॉ. लागू अभिनयाचे विद्यापीठ!

shriram lagoo imagesडॉ. श्रीराम लागू हे अभिनयाचे विद्यापीठ होते. आपल्या अभिनयाने सिने आणि नाट्य रसिकांच्या मनावर गेली पाच दशके अधिराज्य गाजविणारे खरेखुरे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड गेले. डॉ. लागू हे अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही तितकेच सक्रिय होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीत काम करत असताना ‘देवाला रिटायर करा’ हे आवाहन तेव्हा खूपच वादग्रस्त ठरले होते.

shriram lagoo images

 

रात्री डॉ. अचानक आपल्यातून निघून गेले. श्रीराम बाळकृष्ण लागू असे त्यांचे नाव असले तरीही कला क्षेत्रात त्यांना डॉक्टर या नावाने ओळखले जायचे. वैद्यकीय शाखेची पदवी असताना डॉक्टरीचा पेशा सोडून त्यांनी रुपेरी पडदा आणि रंगभूमी गाजवली. वसंत कानेटकरांच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून व्यावसायिक रंगभूमीवर उतरलेल्या डॉ.लागूंनी मागे वळून पाहिलेच नाही. नटसम्राट, गिधाडे, सूर्य पाहिलेला माणूस अशी अनेक नाटके डॉ.लागूंच्या अभिनयामुळे अजरामर झाली.

shriram lagoo images

मेडिकल कॉलेजला जात असतानाच त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. याच दरम्यान, ५० च्या दशकात त्यांनी मुंबई विद्यापीठातून ईएनटी (कान, नाक, घसा) यामध्ये मेडिकलची पद्वी मिळवली. पुढील ६ वर्षे पुण्यात प्रॅक्टिस केली. यानंतर त्यांनी कॅनडा आणि इंग्लंडला जाऊन पुढील प्रशिक्षण घेतले. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात काम करताना श्रीराम लागू यांनी पुरोगामी नाट्य संघटना सुरू केली. तसेच समविचारी कलाकारांना सोबत घेऊन आपले विचार पुढे नेले. देवाला रिटायर करा अशी आरोळी करत त्यांनी पुरोगामी आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे. डॉक्टरांनी रुग्णांची सेवा केली.

shriram lagoo images

डॉक्टर लागू यांनी १०० पेक्षा अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. ४० पेक्षा अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये अभिनय केले. तसेच २० हून जास्त नाटकांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. परंतु, त्यांना पहिले नटसम्राट म्हणून नेहमीच ओळखले जाईल. गोरा रंग, घारेपणाकडे झुकलेले चमकदार डोळे, हाफ बाह्यांचा साधाच रंगीत झब्बा, पांढरा पायजामा आणि गालावरचा तो मस. बोलताना थरथरणा-या गालाबरोबर तोही उठून दिसत होता. आज डॉक्टर आपल्यामधून निघून गेले तरी त्यांचे विचार, त्यांचा अभिनय त्यांनी समाजाला दिलेला संदेश हा नेहमी अजरामर राहिल.

shriram lagoo images

कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राटचे नाटक झाले तेव्हा पहिले नटसम्राट तेच होते. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलावयाचे झाल्यास त्यांच्या पत्नी दीपा लागू सुद्धा मुरलेल्या कलाकार आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लागू यांच्या नाट्य कारकीर्दीसाठी त्यांना फिल्मफेअर, कालिदास सन्मान, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अशा विविध पुरस्कार आणि सन्मानांनी गौरवण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments