Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख‘आप’ने मूड बदलला!

‘आप’ने मूड बदलला!

Arvind Kejriwal Sanjay Singh,Arvind Kejriwal, Sanjay Singh,Arvind, Kejriwal, Sanjay, Singhदिल्लीच्या निकालावरून देशाचा मूड बदललेला दिसतो. जनतेला धर्मांधर्मात तेढ निर्माण करणारे विषय नकोत, सलोखा हवा आहे. सुविधांच्या तुलनेत ३७०, सीएए, एनआरसी हे मुद्दे मतदारांनी नाकारले. दिल्ली काबीज करण्यासाठी अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ, सव्वादोनशे खासदार,विविध राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री, नेते मैदानात उतरले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेत गल्लीबोळात मंत्री खासदारांना पाठविले,पत्रके वाटली. कलम ३७०, बाटला हाऊस चकमक,सीएए,एनआरसी, शाहीनबाग,जामिया मिलिया विद्यापीठ ते पाकिस्तान हे विषय भाजप नेत्यांच्या भाषणात होते. काही नेते केजरीवालांना आतंकवादी ठरवून मोकळे झाले. परंतु दिल्लीच्या जनतेने याला थारा न देता विकासाच्या मुद्यावरून ‘आप’ला संधी दिली.

चवताळलेल्या एका मंत्र्याने गोली मारो.. अशी वक्तव्ये केली. भाजप नेत्यांच्या प्रचारात कोणतेही स्थानिक मुद्दे नव्हते. आणि काँग्रेसने सुरुवातीपासून तलवार म्यान केली. ध्रुवीकरणातून मतविभाजनाचा फटका केजरीवालांना बसू शकतो, हे गृहीत धरुनच भाजपने रणनीती आखली. मोदी-शहा यांची भाषणे केवळ राष्ट्रवादापुढेच पिंगा घालणारी होती. ज्यांना स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रवाद महत्वाचा वाटत होता असा थोडाफार मतदार भाजपकड वळला. परंतु निकालाअंती केवळ तीन चार जागा वाढवण्यापलीकडे भाजपच्या हाती काहीही लागले नाही. मोठमोठाली मंदिरे- मशिदी उभारून रोजगाराचे प्रश्न मिटतील? महागाई कमी होईल? अन्न, वस्त्र- निवा-याचा प्रश्न मिटेल? याबाबत मतदार येत नाहीत. मोठमोठाली मंदिरे, मशिदी उभारून रोजगाराचे प्रश्न मिटेल? याबाबत मतदार जागरूक झाला आहे. दिल्लीत भाजप कार्यकर्ते जय श्रीरामाच्या घोषणा देत असताना आपच्या कार्यकर्त्यांनी जय बजरंगबलीचे नारे दिले. वीज पाणीपुरवठ्यासाठी उत्तम सुविधा पुरविल्याच्या मुद्यांना हात घातला. हिंदुना आवडेल अशा काही गोष्टींची गुंफणही केजरीवालांनी आपल्या प्रचारात हुशारीने केली होती. राष्ट्रीय पातळीवर आम्ही भाजपला तर दिल्लीत पातळीवर केजरीवाल यांनाच मत देणार, असे मत असंख्य दिल्लीकरांनी व्यक्त केले होते. अखेर निकालातून ते स्पष्ट झाले.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड व आता दिल्ली अशा सहा ठिकाणी भाजप सत्तेपासून वंचित राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली असली तरी त्याचा फायदा विविध राज्यांत भाजपला होताना दिसत नाही. दिल्लीच्या निकालानंतर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह यांनी विकारी प्रचाराचा फटका बसल्याचे कबूल केले. प्रत्येक निवडणुकीत विखारी प्रचार करुन निवडणुका जिंकता येत नाहीत. जनतेला विकास हवा, जनता विखारी प्रचाराला थारा देत नाही हे भाजपला दिल्लीच्या निकालावरून उत्तर मिळाले आहेत. त्यामुळे भाजपने पुढील निवडणुकांमध्ये दिल्लीच्या निकालावरून बोध घेणं गरजेचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments