Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रVideo : ‘पुलवामा हल्ल्यात’ आरडीएक्स कुठुन आले,चौकशी कधी होणार? - नवाब मलिक

Video : ‘पुलवामा हल्ल्यात’ आरडीएक्स कुठुन आले,चौकशी कधी होणार? – नवाब मलिक

"We will succeed!", Tweeted NCP Nawab malik

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. आज शुक्रवार ( १४ फेब्रुवारी) रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याबाबत आरडीएक्स कुठुन आले. वाहन घटनास्थळावर कसे पोहचले. याची चौकशी आतापर्यंत झाली नाही. या बाबत अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव दल (सीआरपीएफ) च्या ४० जवानांचा मृत्यू झाला. हा विषय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बनला. नरेंद्र मोदी निवडणूका जिंकले. या हल्ल्यात आरडीएक्स कुठुन आले आणि वाहन घटनास्थळावर कसे पोहोचले. जो ड्रायव्हर गाडी चालवत होता तो तिथल्या तुरुंगात बंद होता अशीही माहिती समोर आली होती. परंतु याची चौकशी होणे गरजेचं आहे.

सरकार स्मारक बनवण्याचं बोलत आहे. परंतु आता पर्यंत याची चौकशी झाली नाही. पुलवामा हल्ल्याचं सत्य देशातील जनतेला जाणून घ्यायचंय त्यामुळे या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी. आधी चौकशी करा नंतर स्मारक बनवा असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे तीन प्रश्न विचारले. पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कुणाला झाला. हल्ल्याच्या तपासात काय निष्पन्न झालं.? ,ज्या त्रुटींमुळे दहशतवाही हल्ला झाला, त्यासाठी भाजप सरकारमधल्या कुणाला जबाबदार धरण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments