ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांना जी मारहाण झाली त्याबद्दल आपले मत व्यक्त केले. खरतर नानांनी काही गुन्हा केला नाही. नाना म्हणाले की,प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. यासाठी अन्न मिळवणे महत्वाचे आहे. त्याकरिता काम करावे लागेल. रस्त्यांवरील फेरीवाले हे अशांपैकीच आहेत. मोलमजुरी करुन ते आपली रोजीरोटी मिळवतात. या विधानानंतर मनसेला झोंबण्याचे कोणतेही कारण नव्हते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘नानांनी चोंबडेपणा करु नये, अशी धमकी दिली. नाना एक ज्येष्ठ कलावंत आहे ते शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी संस्थेमार्फत चांगल काम करतात. खरतर लोकशाही मध्ये कलम १९ प्रमाणे प्रत्येकाला बोलण्याचा,लिहीण्याचा अधिकार आहे. नानांनी आपले विचार व्यक्त केले तो काही गुन्हा नव्हता. नाना आणि ठाकरे यांचे पुर्वीपासूनच एक कौटुंबिक संबंध होते. मात्र यापूर्वीही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘मच्छर’ म्हणून नानांना फटकारले होते. निमित्त होते नानांनी त्यावेळी मराठी साहित्यिक आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात वाद झाला होता आणि नानांनी साहित्यकांची बाजू घेतली होती. कलावंत जर काही चूकीच्या घटनांबद्द्ल बोलत असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अस फक्त नानांबद्दलच नव्हे तर अनेक कलाकरांबद्दल ही घडलेल आहे त्यामध्ये अमिताब बच्चनही सुटलेले नाही. राज्यात,देशात राजकीय मंडळींनी जी परिस्थिती निर्माण केली आहे ती खूप चिंताजनक आहे. कमल हसन लेख लिहीतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. श्याम रंगीला सारखा कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची मिमीक्री करतो त्याला राजकीय पक्षाच्या दबावामुळे शोच्या बाहरे काढून टाकण्यात येते. एखाद्या संघटनेचा पदाधिकारी त्यांना मारण्याची भाषा करतो. हा प्रकार आता तर काही राजकीय नेत्यांबद्दलही घडत आहेत. काही राजकीय नेते हे देशातील एकता अखंडता कायम राहावी यासाठी चिंता व्यक्त करतात. देशातील परिस्थितीवरुन बोलणे चिंता व्यक्त करण् हा काही गुन्हा नाही. ज्यांना देशातील सौदार्यता बिघडवायची आहे ती मंडळी चुकीच्या गोष्टींचे भांडवल करुन आपली राजकीय दुकानदारी चालवतात. हा प्रकार देशासाठी घातक आणि घातकच ठरेल. राजकीय नेत्यांनी संयमाने वागणे गरजेच आहे. परंतु राज ठाकरे यांच्याकडून जे काही घडल तो प्रकार अती झाला त्यांनी संयमानेच बाळगले पाहिजे. अन्यथा हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरेल.