मालवण : सागरी महामार्गावरील कोळंब पूल दुरुस्तीसाठी तब्बल एका वर्षाने मुहूर्त मिळाला आहे. अवजड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आलेल्या पुलाच्या दुरुस्ती कामासाठी काढण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील फेरनिविदा शासनाकडून मंजूर झाली असून ठेकेदारही दुरुस्ती कामासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे कोळंब पूल दुरुस्तीच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.
सागरी महामार्गावरील कोळंब पूल दुरुस्तीची फेरनिविदा अखेर मंजूर
RELATED ARTICLES