Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeक्रीडामादाम तुसाँ म्युझियममध्ये ‘कोहली’चा मेणाचा पुतळा बनवणार!

मादाम तुसाँ म्युझियममध्ये ‘कोहली’चा मेणाचा पुतळा बनवणार!

virat Kohali

 

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आता सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि लिओनेल मेस्सी यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. कारण मादाम तुसाँ म्युझियममध्ये आता कोहलीचा मेणाचा पुतळा बनवण्यात येणार आहे.  कोहलीने १२ वर्षांपूर्वी भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यानंतर भारताच्या पुरुष संघाचे नेतृत्वही त्याच्याकडेच सोपवण्यात आले आहे.

कोहलीला पद्म आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याचबरोबर त्याला आयसीसी आणि बीसीसीआयने पुरस्कार दिले आहेत. मादाम तुसाँ म्युझियमचे एक शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी कोहलीला भेटायला आले होते. यावेळी त्यांनी कोहलीच्या शरीराचे माप घेतले आहे. त्याचबरोबर त्याची हेअरस्टाईल आणि कपड्यांचीही त्यांनी माहिती घेतली आहे.

मादाम तुसाँ म्युझियममध्ये होणाऱ्या आपल्या पुतळ्याबद्दल कोहली म्हणाला की, ” ही माझ्यासाठी फार मोठी बाब आहे. मी मादाम तुसाँच्या व्यवस्थापनाचे आभार मानू इच्छितो, कारण त्यांनी मला हा सन्मान दिला. ही आठवण माझ्यासाठी अविस्मरणीय अशीच असेल. “

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments