Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखजागतिक महामारी!

जागतिक महामारी!

गभरात थैमान घातलेल्या कोरोनाला अखेर जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगभरात कोरोनाचे १,१७,३३९ रुग्ण सापडले. देशाच्या ३० राज्यांमध्ये कोरोना . महाराष्ट्रात कोरोनाचे १५ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये पुण्यात सर्वात जास्त ९, पिंपरी चिंचवड ३, नागपूर १, तर मुंबईत २ कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झाली आहे. तर ९ रुग्ण संशयित आहेत. कोरानाचा जगभरात बाजारपेठा, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि राजकीय घटनांवर, धार्मिक स्थळांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. न्यूयार्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, प्लोरिडा, ओरेगॉन, उटाह, मेरीलॅंड, केदुकी, मॅसेच्यूसेट्स, न्यू जर्सी, कोलोरॅडो राज्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोनांमुळे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.

युरोप खंडात कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका इटलीला बसला आहे. देशात ६३१ जणांचा बळी घेतला होता. चीनमध्ये कोविड-१९ चे ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून ३,१५८ वर मृतकांचा आकडा पोहचला आहे. संपूर्ण जगात कोविड – १९ चे एक लाख १७ हजार ३३९ रुग्ण असून १०७ देशांमध्ये ४,२५१ मरण पावले आहेत. इराणमध्ये कोरोनामुळे दोनशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून ८ हजारांवर पोहोचली आहे. भारतीयांना तेथून सुरक्षित मायदेशी आणण्याचे मोठे आव्हान परराष्ट्र मंत्रालयासमोर आहे. विदेशातून येणा-या रुग्णांची तपासणी करण्यात येत असून तपासणीसाठी विशेष कक्ष उघडण्यात आले आहेत. विदेशांध्ये शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. तर दिल्लीमध्येही शाळांना ३२ मार्चपर्यंत सुट्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये गरज पडल्यास शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगिलते. विदेशात कुणीही जाऊ नये, असंही आवाहन करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा शेअर मार्केटला फटका बसला आहे. बस स्थानक,रेल्वेस्थानक,विमानतळावर कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. दक्षता बाबत सूचना करण्यात येत आहे. सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून संशयितांवर उपचार केले जात आहेत. परंतु जगभराचा विचार केला तर नागरिकांमध्ये भीती कायम आहे. नागरिकांनी ऐकीव माहिती, अफवांवर विश्वास ठेवू नका. जर लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता मान्यताप्राप्त डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जवळच्या सरकारी रुग्णालयात कोरोनो विषाणूंच्या निदानाची तपासणी करुन घ्यावी. डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हावे. भोंदू डॉक्टरांचे उपचार घेऊ नका. याबाबत नागरिकांनी स्वत: काळजी घेणे गरजेचं आहे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments