Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईधक्कादायक : महाराष्ट्रात कोरोनाचे १५ रुग्ण!

धक्कादायक : महाराष्ट्रात कोरोनाचे १५ रुग्ण!

Mumbai Airport Coronavirus,Mumbai Airport, Coronavirus,Mumbai,Mumbai Coronavirus, Coronavirus,Airport Coronavirus,virusमुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. पुणे ९, मुंबई २, नागपूर १ तर पिंपरी चिंचवडमध्ये ३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांमधून प्रवास केलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.

कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments