Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखगुन्हेगारीच्या कलंकाची चिंता!

गुन्हेगारीच्या कलंकाची चिंता!

हाराष्ट्राला सुफी संतांची परंपरा असून,थोर महापुरुष या राज्याने दिले आहेत. असे नेहमीच आपण ऐकतो,वाचतो, परंतु आपल्या राज्यावर गुन्हेगारीच्या कलंकाचे डाग वाढत चालले आहे. सत्तापरिवर्तन होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला. परंतु परिस्थिती सुधारण्याऐवजी, खूप भयावह होत चालली आहे. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसल्यामुळे कायदा सुव्यस्थेची वाट लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवल्याने गृहखाते हे रामभरोसे चालले की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, चोऱ्या, हत्या, भ्रष्टाचार, अपहरण, अल्पवयीन व्यक्तींकडून होणारे गुन्हे,सायबर गुन्हे यांच्यात थक्क करणारी वाढ झाली आहे. हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून घेण्यात आलेल्या २०१६ च्या आकडेवारी नुसार गुन्ह्यांचा आढाव्यातून दिसून येते. महाराष्ट्रात २०१६ मध्ये आयपीसीनुसार २ लाख ६१ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. देशात सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवले गेले. त्यानंतर मध्य प्रदेश तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. हत्यांमध्ये बिहारनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. सर्वाधिक हत्या उत्तर प्रदेशात झाल्या. उत्तर प्रदेशात एकूण ४ हजार ८८९ हत्या झाल्या. दुसरा क्रमांक बिहारचा लागतो. तर तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. महाराष्ट्रात २ हजार २९९ हत्यांची नोंद झाली. अपहरणात महाराष्ट्र बिहारच्या पुढे आहे. महाराष्ट्र अपहरणांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात अपहरणाच्या ९ हजार ३३३ घटनांची नोंद झाली. अल्पवयीन व्यक्तींकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यामध्ये ६ हजार ६०६ प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली. अल्पवयीन व्यक्तींवर होणाऱ्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद मध्य प्रदेशात झाली. सायबर गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक दुसरा लागतो. महाराष्ट्रात ३ हजार २८० सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्ये सर्वाधिक सायबर गुन्हे नोंदवले गेले. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल असून शासकीय कर्माचारी-अधिकाऱ्यांविरोधात लाच घेतल्याप्रकरणी देशभरात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण १ हजार १६ प्रकरणांची नोंद झाली. सर्व आकडेवारी वरुन गुन्हेगारी कितीमोठ्या प्रमाणात बोकाळली आहे हे स्षष्ट होते. गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी गृहखात्याला कडक पाऊले उचलावे लागण्याची आवश्क्यता आहे. गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस प्रमाण वाढले असून राज्यात काय चाललयं हा प्रश्न उपस्थित होतो. गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी कडक पाऊले उलण्याची गरज आहे. तर आणि तर हा महाराष्ट्र थोर समाजसुधारक,सुफी संताचा आहे असे आपल्याला अभिमानाने बोलता येईल अन्यथा गुन्हेगारीचा कलंक महाराष्ट्राच्या कपाळावर लागल्याशिवाय राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments