Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeआरोग्यलवंगाचा चहा थंडीत आजारापासून दूर ठेवेल

लवंगाचा चहा थंडीत आजारापासून दूर ठेवेल

Clove Tea, Winter, Lifestyle, Health, Fitnessथंडीचे दिवस म्हटले की प्रत्येकाला कडक चहा लागतोच. मसाला चहा, लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी असा चहा हा नेहमीच घेतला जातो. यामध्ये आणखी एका चहाचा समावेश होतो तो म्हणजे लवंग चहा. थंडीच्या दिवसात लवंगाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. चला तर मग जाणून घेऊया लवंगाच्या चहाचे काही फायदे.

१. सर्दीपासून बचाव करण्यासाठी लवंगाचा चहा अत्यंत फायदेशीर असतो. थंडीच्या दिवसात दोन ते तीन वेळा लवंगाचा चहा प्यायल्यास सर्दी खोकल्यासारख्या आजारापासून बचाव होतो.
२. तुम्हाला जर ताप आला असेल तर लवंगाचा चहा आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
३. अंग दुखत असल्यास लवंगाचा चहा पिणे फायदेशीर ठरेल.
४. पचनासंबंधित काही समस्या असल्यास लवंगाचा चहा उपयुक्त ठरतो. अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास तसेच पचनशक्ती मंदावल्यास लवंगाचा चहा प्यावा.
५. दात दुखत असल्यास अनेकदा लवंगाच्या तेलाचा वापर केला जातो. मात्र लवंगाचा चहाही त्यासाठी फायदेशीर ठरतो.

थंडीत झटपट असा बनवा लवंगाचा चहा

कृती – एक चमचा लवंग बारीक वाटून त्याची पूड करा. एक कप पाण्यात तयार केलेली लवंगाची पूड टाकून १० मिनिटे उकळवा. जेव्हा पाणी उकळण्यास सुरुवात होईल तेव्हा अर्धा चमचा चहा पावडर टाका. त्यानंतर काही मिनिटे चहा उकळल्यावर चहा तयार होईल. तयार झालेला लवंगाचा चहा गाळून घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments