Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयईव्हिएम घोटाळे – तथ्य किती ? तर्क किती ?

ईव्हिएम घोटाळे – तथ्य किती ? तर्क किती ?

ईव्हीएम छेडछाडी संदर्भात “लोकशाही धोक्यात “असल्याचे बहुतांशी विरोधी पक्षांद्वारे आरोप केले जात आहेत. एका भारतीय हॅकरने विदेशात या संदर्भात आपला दावा सिद्ध करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती परंतु एका मुद्द्यावर त्याने बोलायचे टाळले ते म्हणजे ईव्हिएममधील घोटाळे टाळण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने योजलेल्या विविध सुरक्षा उपाययोजना! ह्या उपाययोजना ढोबळमानाने विविध प्रक्रियांमध्ये वर्गीकृत केल्या जाऊ शकतात. ह्या मशीन्स मतदान केंद्रांवर हलविण्यापूर्वी तीन टप्प्यांवर तपासणी आणि तीन मॉक पोल्सच्या प्रक्रियेमधून जातात. दरम्यान, मशीन्स शेवटपर्यंत सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवल्या जातात.

वास्तविक निवडणुकीपूर्वी 100 मतांचे मॉक वोटिंग घेऊन सदोष मशीन ताबडतोब बदलली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला प्रमाणित करण्यासाठी साक्षीदार म्हणून सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तिथे हजर असतात. मतदानानंतरही गोदामांमध्ये मशीन्स चोवीस तास सीसीटीव्हीच्या कडक निगराणीत ठेवल्या जातात. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देख्ररेखीत सील केलेली ईव्हीएम्स सशस्त्र रक्षकांच्या तैनातीत  हलविली जातात. सीसीटीव्ही त्री-स्तरीय सशस्त्र सिक्युरिटीची पूर्तता करते. त्यांच्या सहमती, तपासणी किंवा मंजूरीशिवाय कोणतेही तांत्रिक निर्णय घेतले जात नाही. कठोरपणे तपासणी प्रक्रियेचे पालन केले जाते आणि दिवसातून कोणत्याही वेळेला ईव्हीएम तपासण्याचे त्यांना स्वातंत्र्य असते. भारतात ईव्हीएम मशीन्स करीता उच्च दर्ज्याची संरक्षण व्यवस्था आहे आहे म्हणून त्यात घोटाळे करणे दुरापास्त आहे.

पण तांत्रिकदृष्ट्या, सध्या ईव्हीएम ‘हॅक’ करणे शक्य आहे जे अलीकडील निवडणुकीत करण्यात आले होते. पण ते हॅक करण्यासाठी आपण काही तथ्य विचारात घ्यायला हवीत. ईव्हीएम हॅक करण्यासाठी प्रत्यक्षात बॅलेट युनिटमध्ये प्रवेश करता येऊन पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. पुरेसा अवधी असल्यास आणि त्या ठिकाणी प्रवेश शक्य असल्यास मूळ चिप बदलली जाऊ शकते, प्रत्यक्ष प्रवेश शक्य नसेल तर किमान वाय फाय कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्यात घोटाळा  केल्या जाऊ शकतो. ब्लूटुथ आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे सहज केल्या जाऊ शकतं तसेच बॅलट मशीनच्या प्रोग्रॅमिंग पोर्टमध्ये प्रवेश शक्य असल्यास मशीन हॅक केली जाऊ शकते. संगणकाशी कनेक्ट केलेल्या ईव्हीएमच्या प्रोग्रामिंग पोर्टमध्ये वायर बसवून कोडींग बदलल्या जाऊ शकतं.

प्रश्न असा आहे की असे करणे शक्य आहे का? उत्तर आहे – नाही .

कारण तयार सर्किट असेल तरी हॅकरला इतका वेळ मिळणे शक्य नसते. ईव्हिएमचे ‘मदरबोर्ड’ उघडण्यासाठी, काढण्यासाठी किंवा परत बसवण्यासाठी करण्यासाठी ९० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागतो. मतदान केंद्रावरील कडक सुरक्षा व्यवस्था भेदून हॅकिंगची उपकरणे तेथे घेऊन जाणे जवजवळ अशक्य आहे. शिवाय ईव्हीएम मशीनमध्ये अशी एक व्यवस्था असते कि प्रत्यक्षात मशीन मध्ये काही टँम्परिंग(बदल) करण्याचा प्रयत्न केल्या गेल्यास मशीन निरुपयोगी होईल आणि पुनर्वापर केला जाऊ शकणार नाही. बॅलट युनिट आणि कंट्रोल युनिट ही दोन्ही स्वतंत्र उपकरणे आहेत. याचा अर्थ असा की ती कोणत्याही इतर प्रोग्राम किंवा उपकरणाशी जोडली जाऊ शकत नाहीत. मतमोजणीच्या वेळेला बॅलट युनिट कंट्रोल युनिटला जोडल्यानंतरच एकमेकांशी माहिती देवाण घेवाण करू शकतात. इंटरनेट किंवा ब्लूटूथशी कनेक्ट करण्यासाठी त्यात कुठलीही यंत्रणा नाही. मुख्य मायक्रोकंट्रोलर प्री-बर्न प्रोग्रामसहित येतो ज्यास बदलणे शक्य नाही कारण ते एकदाच प्रोग्राम केले जाऊ शकते. तसेच वैकल्पिक प्रोग्राम लिहायला, हॅकरला ईव्हीएमच्या सर्किटचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागतो की ईव्हीएमच्या कुठला पोर्ट कशाशी जोडला आहे.

बॅलट मशीन एका काउंटरप्रमाणे (मोजमापक यंत्राप्रमाणे)काम करते अर्थात एक विशिष्ट बटण किती वेळा दाबल्या गेले त्याची ते मोजणी करतं. प्रत्यक्षात बटण जेव्हा दाबले जाते तेव्हा ते प्रोग्राम मध्ये केवळ एकदाच रीड ओन्ली व्हावे(वाचले जावे)अश्या प्रकारे त्याची रचना केलेली असते. म्हणून एक मत नोंदवण्याकरिता बॅलट मशीन काही सेकंदाचा अवधी घेते आणि त्या काही सेकंदांमध्ये कोणतेही बटण दाबल्यास इतर काहीही नोंदणी होत नाही.

हॅकिंग शक्य नाही असे मी म्हटल्यास तुम्हास कदाचित दिल्ली विधानसभेत ‘आप’ ने प्रदर्शित केलेल्या ईव्हीएमची आठवण होईल. ते एक विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयंनिर्मित ईव्हीएम होते ज्यांचे कोड त्यानुसार लिहिले गेले होते. तो एका अभियांत्रिकी महाविद्यालयीन पातळीचा लघु-प्रकल्प होता. त्यात कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती कारण ते केवळ ईव्हीएम किती असुरक्षित आहे हे दर्शविण्यासाठी प्रोग्राम केल्या गेले होते. प्रत्यक्षात वापरले जाणारे ईव्हीएम्स बऱ्याच सुरक्षा वैशिष्ट्यांसह प्रोग्राम केलेले असतात.

काही राजकीय पक्षांनी असेही आरोप केले की ह्या मशीन्स विदेशात बनविल्या जातात आणि ज्या देशांनी यांचे उत्पादन केले ते स्वत: ह्यांचा वापर करीत नाहीत कारण त्यात घोटाळे बाजी करणे शक्य आहे. खरतर ही चुकीची माहिती आहे. ईव्हिएम्स भारतीय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्याद्वारे(पीएसयू)उत्पादित केले जातात आणि आपण प्रत्यक्षात विविध आफ्रिकन आणि आशियाई देशांमध्ये त्यांची निर्यात करीत आहोत. आपण भारतीय तंत्रज्ञांना कमकुवत समजू नये. याव्यतिरिक्त, भारतीय निवडणूक आयोग ही एक विश्वासार्ह संस्था आहे आणि जगात या संस्थेची विश्वासाहर्ता कायम आहे. काही लोक या संस्थेच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत जे लज्जास्पद आहे.

याद्वारे आम्ही सर्व अधिकारी, उत्पादन कंपन्या, सरकारी अधिकारी निरपराध आहेत असे मानत आहोत आणि ईव्हीएमची छेडछाड करण्याची संधी त्यांच्या अख्त्यारीपलीकडची आहे असे मानतो. ही उपकरणं बनविणारी कंपनी अत्यंत कुशल आहे आणि त्या कुशलतेआड त्यांनी काही गुप्त कवाडं ठेवली असावित ज्यांची वाट केवळ त्यांनाच ठाऊक आहे.

 

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments