Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रयोगी आदित्यनाथ जनरल डायर; नवाब मलिकांचं टीकास्त्र

योगी आदित्यनाथ जनरल डायर; नवाब मलिकांचं टीकास्त्र

Shiv Sena chief minister for five years; Good News in Two Days: Nawab Malikमुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांबाबत चुकीचं विधान केलं. उत्तरप्रदेशात आंदोलनादरम्यान, २२ तरुणांचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. त्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. योगी म्हणजे जनरल डायर आहेत, अशा शब्दांत मलिक यांनी योगींवर टीकास्त्र सोडले आहे.

मरायला आला तर जीवंत कसे जाल, ज्यांना मरायचे आहे, त्यांना वाचवण्यासाठी काहीही करता येणार नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात आंदोलकांनीच गोळीबार केला आणि त्यांच्याच गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, असं धक्कादायक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं.

असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. लोकशाहीत योगींचं हे विधान कदापि खपवून घेतलं जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही लोकांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतरही उत्तर प्रदेशातील आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. योगी आदित्यनाथ हे जनरल डायर सारखं वागत आहेत. हे कदापिही सहन केलं जाणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ…

मरायला आला तर जीवंत कसे जाल, ज्यांना मरायचे आहे, त्यांना वाचवण्यासाठी काहीही करता येणार नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात आंदोलकांनीच गोळीबार केला आणि त्यांच्याच गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, असं धक्कादायक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधत (CAA) उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीसह देशातील अनेक भागात हिंसक आंदोलन होत आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्रीही उडाली आहे. या आंदोलनावेळी अनेकांचा मृत्यूही झाला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये या आंदोलनाला अत्यंत हिंसक वळणही लागलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments