Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशकाँग्रेस,राष्ट्रवादीसोबत कॉमन मिनिमम प्रोगामनुसार काम सुरु : उध्दव ठाकरे

काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत कॉमन मिनिमम प्रोगामनुसार काम सुरु : उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray Delhi Visit,Uddhav Thackeray, Delhi Visit,Uddhav Delhi Visit,Thackeray Delhi Visit,Uddhav Thackeray Delhi,Uddhav Delhi, Thackeray Delhi

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज दिल्ली दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी CAA ला घाबरण्याची गरज नाही असं सांगितलं. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे असं सांगितलं. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतेही मतभेद नाही. कॉमन मिनिमम प्रोगामनुसार काम सुरु आहेत. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

पंतप्रधानांसोबत CAA, NPR, NRC या मुद्द्यांवरही चर्चा झाली अशी भूमिका स्पष्ट केली. तसंच राज्याच्या विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. शेतक-यांचे प्रश्न आहेत. तसेच केंद्रांकडून मिळणारा निधी हळू हळू येत आहे. त्यासंदर्भातही चर्चा झाली. केंद्रात आणि राज्यात समन्वय साधूनच कारभार करावा लागतो असंही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय काय घ्यायचे आम्ही ते घेत आहोत. काही निर्णय घेतले आहेत असंही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सांगितले. यावेळी खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments