Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमी उदयनराजे यांच्यापेक्षा सरस : संजय काकडे

मी उदयनराजे यांच्यापेक्षा सरस : संजय काकडे

Udayanraje Bhosale Sanjay Kakade,Udayanraje Bhosale, Sanjay Kakade,Udayanraje, Bhosale, Sanjay, Kakadeमुंबई : राज्यसभेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये कुरबूर सुरु झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेत संधी दिली जाणार आहे. उदयनराजे हे नुकतेच भाजपमध्ये आले आहेत. त्याचं योगदान मोठं नाही. ते भाजपमध्ये आले, निवडणुकीला उभे राहिले आणि पडले. अशी तोफ भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी भोसलेंवर डागली.

मी उत्तम काम केलं असून मेरिटच्या आधारे मला तिकीट मिळेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. उदयनराजे यांना मंत्रिपद मिळेल असं वाटत नाही असंही ते म्हणाले. मी उदयनराजे यांच्यापेक्षा सरस आहे. भोसले आहेत म्हणून ते माझ्या पेक्षा सरस ठरत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत. ते महाराज आहेत. मी देवेंद्र यांचा मोहरा आहे. फडणवीस हेच माझे मोदी शहा आहेत असंही त्यांनी सांगितलं.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश करताना पोटनिवडणुकीत पराभव झाला तर राज्यसभेत संधी द्यावी अशी अट घातली होती. त्यानंतर भोसले यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने ती अट मान्य केली होती. प्रवेशानंतर भोसलेंचा पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे उदयनराजे यांना राज्यसभेवर संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिकाम्या होत आहेत.

राष्ट्रवादीचा प्रवेश थांबवला होता…

काकडे आधी राष्ट्रवादीच्या जवळ असलेले होते. २०१४ मध्ये लोकसभेत मोदी सरकार आल्यानंतर काकडे हे भाजपच्या जवळ गेले. काही वर्ष ते सातत्याने वादग्रस्त विधानं करत चर्चेत राहिले. विधानसभा निवडणुकीदरम्यान ते पुन्हा राष्ट्रवादीत परत जातील अशी चर्चा झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments