Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पोलीस भारतात घेऊन परतणार

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पोलीस भारतात घेऊन परतणार

Ravi Pujari, gangster, pujari, ravi,underworld don, underworld, मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगल देशात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी व कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या पूर्ण केली जात असून आज उशिरा रात्री त्याला घेऊन पोलीस भारतात परतणार आहे.

रवी पुजारीला २१ जानेवारी २०१९ रोजी सेनेगलची राजधानी डकारमधील एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर जून २०१९ मध्ये तो फरार झाला होता. त्यानंतर त्याचा कोणताच मागमूस लागत नव्हता. आता सेनेगलमधूनच त्याच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणांना यश आलं आहे. प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुजारीला भारताच्या हवाली करण्यात आले आहे. परतीच्या विमानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारीच पुजारीला भारतात आणलं जाईल. सुरुवातीला तो कर्नाटक पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात येईल.

याचिका फेटाळून लावल्याने झाली कोंडी…

रवी पुजारीच्यावतीने प्रत्यार्पणास आव्हान देणारी याचिका सेनेगलच्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने पुजारीची कोंडी झाली. या घडामोडींनंतर पुजारीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला होता.

रवी पुजारी या नावाने वावरायचा…

रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावाने वावरत होता. सेनेगलमधील तपास यंत्रणांच्या लेखी याच नावाची नोंद होती. बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट त्याच्याकडे होता. रवी पुजारीचे आधी थायलंड, मलेशिया, मोरोक्को या देशांत बस्तान होते तर नंतर पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रीपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांत त्याने आपला मुक्काम हलवला. गेल्या आठ वर्षांत पुजारीने सेनेगल, बुर्किना फासो या देशांत ‘नमस्ते इंडिया’ नावाने अनेक रेस्टॉरंट उभारली. सेनेगलची राजधानी डकारमध्ये जवळपास गेल्या दशकभरापासून तो पत्नी, मुलांसह राहत असून अत्यंत आलीशान जीवन जगत आहे.

महाराष्ट्र, गुजरात,कर्नाटमध्ये गुन्हे

रवी पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी व अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये ३९, मंगळूरमध्ये ३६, उडुपीमध्ये ११ तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील २६ गुन्हे मकोकाखाली दाखल झालेले आहेत. गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी ७५ गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या दोन दशकांपासून पुजारी भारताला गुंगारा देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments