Placeholder canvas
Wednesday, May 15, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे हाजीर हो; वॉरंट जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हाजीर हो; वॉरंट जारी

मुंबई : दोन दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये गुप्त बैठक झाली होती. मनसे आणि भाजपची जवळकीता वाढत असतांना राज ठाकरेंना दणका बसला आहे. छठपूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. रांची दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फहीम किरामनी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.

छठपूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. मुंबईचे स्थानिक निवासी अंखुरी अंजनी कुमार यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर न्यायालयाने वॉरंट बजावले आहे. रांची दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फहीम किरामनी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने राज यांना 18 फेब्रुवारी 2020 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे आहे प्रकरण…

शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर 2006 साली राज ठाकरे यांनी मनसे या नव्या पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा हाताशी धरत उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. याच पार्श्वभूमीवर 20 जानेवारी 2008 रोजी राज ठाकरे यांनी छठपूजेबाबत वक्तव्य केले होते.

काय होते राज ठाकरेंचे ते विधान…

“उत्तर भारतीयांचे छठपूजेचे हे नवे नाटक कुठून आले? महाराष्ट्रात राहायचे असेल तर महाराष्ट्राची संस्कृतीसोबतच तुम्हाला राहावे लागेल”, असे राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उत्तर भारतीय नेत्यांकडून प्रचंड टीका केली गेली होती. याशिवाय बिहारच्या मुजफ्फर न्यायालातही त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. राज ठाकरे न्यायालयात सुनावणीच्या तारखेला हजर राहत नाहीत म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. त्यावेळी हे प्रकरण प्रचंड गाजले होते. नंतर 2018 साली राज ठाकरे स्वत: मुंबईत छठपूजेच्या कार्यक्रमात हजर राहिले होते. हे विशेष.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments