Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
HomeदेशCAA- NRC : अमित शाहांच्या रॅलीत बॅनर झळकवले; दोन तरुणींना घरातून हाकलले!

CAA- NRC : अमित शाहांच्या रॅलीत बॅनर झळकवले; दोन तरुणींना घरातून हाकलले!

Amit-Shah, caa, nrcनवी दिल्ली : भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रॅली जात असताना दोन तरुणींनी CAA आणि NRC विरोधातील बॅनर बाल्कनीतून झळकावलं. त्यामुळे भाजपच्या १५० कार्यकर्त्यांनी ईमारतीला घेराव घातला. चार तासानंतर दोन्ही तरूणींना घरमालकाने घरातून हकालपट्टी केली.

दोन तरुणींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या गल्लीतून रॅली जात असताना माझ्यासोबत राहणारी माझी मैत्रीण आणि मी आमच्या बाल्कनीतून हे बॅनर झळकावलं. आम्ही निषेध नोंदवताना कोणतीही आक्षेपार्ह तसंच अपमानकारक भाषा न वापरण्याचं ठरवलं होतं. आम्ही निषेध नोंदवल्यानंतर रॅलीतील काहीजण संतापले आणि आम्हाला धमक्या देत आक्षेपार्ह भाषा वापरु लागले. जवळपास १५० जणांचा जमाव आमच्या घराखाली जमला होता. आमचा बॅनर ओढून घेत फाडून टाकण्यात आला. तो जमाव आमच्या घराच्या दिशेने चालून आला आणि दरवाजा उघडला नाही तर तोडण्याची धमकी देऊ लागला. आम्हाला इतक्या हिंसक प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. आम्हाला भीती वाटल्याने घरातच कोंडून घेतलं. मात्र जमाव दरवाजा ठोठावत होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली तेव्हा कुठे जमाव शांत झाला. अशी माहिती तरुणीने दिली आहे.

घर मालकाने कुलूप लावलं….

पायऱ्यावरुन जाताना लागणाऱ्या प्रवेशद्वाराला आमच्या घर मालकाने कुलूप लावलं. घरमालकदेखील त्या जमावात सामील होते. यामुळे आम्ही घरातच अडकून पडलो आणि कुठेही बाहेर पडणं शक्य नव्हतं. आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींना फोन करुन मदत मागितली. आमचे मित्र मदतीसाठी पोहोचले असता जमावाने त्यांना अडवलं आणि धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनाही घऱात प्रवेश दिला गेला नाही. जवळपास तीन ते चार तास आम्ही आत अडकलो होतो. यादरम्यान आमच्या घरमालकाने तुम्हाला घरातून बाहेर काढत असल्याचं सांगितलं, असं तरुणीने सांगितलं आहे.

मित्रांची मध्यस्थी….

पोलीस, मित्रांनी मध्यस्थी केल्यानंतर वडिलांना आतमध्ये पाठवण्याची परवानगी त्यांनी दिली. पोलिसांनी जमावाविरोधातील आमची तक्रार दाखल करुन घेतली. सात तासांनी आम्हाला पोलिसांच्या सुरक्षेत घराबाहेर काढण्यात आलं. आम्ही आमचं सामान गोळा केलं आणि निघून गेलो असं तरुणीने सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments