Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याउध्दव ठाकरे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

उध्दव ठाकरे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Uddhav Thackeray will take oath as CMमुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार 78 तासांत कोसळल्यामुळे राज्यात भूकंप झालं. अजित पवारांनी आपल्या  उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचं सरकार विश्वासदर्शक ठरावापूर्वीच कोसळलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती समोर येत आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीकडून उद्या आपलं सरकार स्थापन करणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत तर बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला. फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्याकडे बहुमत नव्हतं. त्यामुळे मी राजीनामा दिला. असं सांगितलं. महाआघाडीने सोमवारी आपल्याकडे बहुमत असल्याचे राज्यपालांना पत्र दिलं होत. सर्वेाच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बुधवारी बहुमत चाचणी होणार आहे. यावेळी भाजप बहुमत सिध्द करु शकत नाही हे स्पष्ट झाल्यामुळे भाजपने सत्तेच्या मैदानातून माघार घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments