Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याआमदारांना 'हात उंचावून' करावं लागणार मतदान

आमदारांना ‘हात उंचावून’ करावं लागणार मतदान

Supreme Court orders floor test in Maharashtra assembly tomorrowमुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारची बुधवारी अग्नी परीक्षा होणार आहे. बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, हात उंचावून आमदारांना मतदान करावं लागणार आहे. त्यासाठी आमदारांची फाटाफूट होणार नाही. सर्व मतदान प्रक्रिया लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. त्यामुळे घोडेबाजार होणार नाही. ज्या पक्षांकडे आघाड्यांकडे बहुमत आहे. त्यांचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे.

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात 24 तासाच्या आत बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह टेलिकास्ट प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात महत्वाचे मुद्दे…

1.महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्याच बुधवारी २७ नोव्हेंबररोजी बहुमत चाचणी घ्या

2.संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सर्व आमदारांचा शपथविधी घेऊन तात्काळ बहुमत चाचणी घ्या.

3.आमदारांचा शपथविधी हा हंगामी अध्यक्ष घेतील. त्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात यावी.

4.बहुमत चाचणीसाठी होणारं मतदान गुप्त पद्धतीने होऊ नये.

5.बहुमत चाचणीच्या संपूर्ण प्रक्रियेच लाईव्ह टेलिकास्ट करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments