Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेला पोलिसांचा दणका ‘ते’ फलक पोलिसांनी हटविले

मनसेला पोलिसांचा दणका ‘ते’ फलक पोलिसांनी हटविले

Raj Thackeray, MNS Poster,Raj Thackeray MNS Poster,Raj, Thackeray, MNS, Posterमुंबई : “घुसखोर कळवा, ५५५५  बक्षीस मिळवा” असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलं होतं. ते पोस्टर पोलिसांनी हटविले आहेत. राज ठाकरेंच्या इशा-यानंतर बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात जोरदार मोहिम सुरु आहे. त्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली होती.

चारकोप विधानसभा परिसरात लिंक रोड येथे मनसेकडून घुसखोरांची माहिती देण्याचं आवाहन करणारं बॅनर लावण्यात आलं होतं. यावर “घुसखोर कळवा, ५५५५ बक्षीस मिळवा” असं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी या बॅनरवरच कारवाई करत पोस्टर हटवल्याने मनसेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

चारकोप परिसरात मनसेच्या या पोस्टरबाजीवरच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत पोस्टर हटवले आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

राज ठाकरे यांनी २३ जानेवारीला मनसेच्या अधिवेशनात आणि ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथील मोर्चामध्ये एक आवाहन केलं होतं. यात त्यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हकललंच पाहिजे, असं म्हटलं. यानंतर मुंबई पोलिस या घुसखोरांवर कारवाई करत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments