Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मुंबईला एक दिवस देण्याचा पवारांचा सल्ला

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मुंबईला एक दिवस देण्याचा पवारांचा सल्ला

sharad pawar on cm devendra ncp bjp

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आठवड्यातील एक दिवस मुंबईला देण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष, ना.नवाब मलिक यांनी दिली. मुबंई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आज रविवार (१ मार्च) रोजी सोमैय्या मैदान, चुनाभट्टी सायन, मुंबई येथे संपन्न होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुका लक्षात घेता. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होत आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढावी. यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आठवड्यातील एक दिवस मुंबईला देण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांना, मंत्र्यांना शरद पवारांनी दिला आहे. मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी नेत्यांच्या मुंबईतील कार्यक्रमांमुळे फायदा होईल. त्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीति आखली आहे. अशीही माहिती ना. नवाब मलिक यांनी दिली आहे. आजच्या कार्यक्रमात उपस्थितीत करण्यात आले. शिबिरासाठी ज्येष्ठ नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यंने हजेरी लावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments