Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यानिर्भया बलात्कार प्रकरणी 17 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

निर्भया बलात्कार प्रकरणी 17 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Nirbhaya rape case hearing in Supreme Court December 17नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कारामधील चारही आरोपींना आज पटियाला हाऊस न्यायालयात हजर केलं जाणार होतं. मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 17 डिसेंबर रोजी सु्प्रीम कोर्टात होणार आहे.

आज आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर केलं जाणार होतं. परंतु आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भयाच्या आरोपींचे वकील न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार होते त्यानंतर व्हिडीओ. कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीला सुरुवात होणार होती. 16 तारखेला आरोपींना फाशीची होईल अशी शक्यता व्यक्ती केली जात होती मात्र, आता ती शक्यता मावळली आहे. 17 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष याकडे लागले आहे.

आरोपींकडून फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेपची शिक्षा द्यावी यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या आरोपींनी फासावर लटकवा अशीही मागणी निर्भयाच्या कुटुबियांकडून करण्यात आली होती.

फाशीची शिक्षा जाहीर करा; निर्भयाच्या आईची मागणी…

मी न्याायलयाला हेच सांगणार आहे की, आरोपींनी खूप मजामस्ती करुन घेतली आहे. आता लवकरात लवकर यांचा डेथ वॉरंट काढा आणि फाशीची शिक्षा जाहीर करा. पुढे बोलताना त्यांनी व्यवस्थेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं. जर आपली व्यवस्था दुबळी नसती तर आरोपीचे वकील व्यवस्थेला आव्हान देऊ शकले नसते. त्जेव्हा आरोपी गुन्हा करतात तेव्हा आपला देश आंबेडकर आणि गांधींचा देश नसतो का ? गुन्हा झाल्यावरच सगळ्यांना ते का आठवतात,” अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे.

सात वर्ष झाली मात्र आरोपींना अद्यापही शिक्षा झालेली नाही. यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे. कोणताही गुन्हा करा शिक्षा मिळणार नाही असा संदेश समाजात जात आहे, अशी भीती निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments