Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराहुल गांधीच्या 'मेक इन इंडिया' नव्हे 'रेप इन इंडिया' वक्तव्यावरून संसदेत गदारोळ

राहुल गांधीच्या ‘मेक इन इंडिया’ नव्हे ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून संसदेत गदारोळ

Lok Sabha has a huge uproar over Rahul Gandhi shocking statement rap in Indiaनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मेक इन इंडिया’ आता ‘रेप इन इंडिया’ बनला आहे. महिला अत्याचारांच्या घटनेवरून महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असे विधान राहुल गांधी यांनी झारखंडच्या सभेत केले होते. त्या विधानाचा आधार घेऊन संसदेमध्ये भाजपचया महिला खासदारांनी गदारोळ केला.

राहुल गांधी यांनी झारखंडच्या सभेमध्ये देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांचा हवाला देत आपल्या भाषणामध्ये चिंता व्यक्त केली होती. तसेच हैदराबादमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार, हत्येचा उदाहरण देऊन महिलांमध्ये भिती निर्माण झाली आहे. महिला असुरक्षित आहेत असे सांगितले होते. त्यावरून भाजप खासदारांनी संसदेत आज गदारोळ केला. देशाचा अपमान आहे असा आरोप भाजप खासदारांनी केला. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला होता.

राहुल गांधींनी देशाचा अपमान केला. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावरून अधिवेशन काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. भाजपच्या महिला खासदरांनी घोषणाबाजी केली. भारतात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. संसदेत 45 टक्के खासदारांवर गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. 19 टक्के खासदारांवर बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहेत. विदेशात भारताची इमेज मलिन होत चालली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments