Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeदेशफाशी टाळण्यासाठी निर्भयाच्या खून्याने ‘हा’ प्रकार केला

फाशी टाळण्यासाठी निर्भयाच्या खून्याने ‘हा’ प्रकार केला

Vinay Sharmaनवी दिल्ली : निर्भयाच्या खून्यांना फासावर लटकवण्यासाठी नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आला आहे. न्यायालयाने तिस-यांदा फाशीसाठी ३ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. दरम्यान, आरोपी विनयने फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी स्वत:चं डोकं भिंतीवर आपटलं.

दिल्ली गँगरेपचा आरोपी विनयने स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न केला. विनय कुमारने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटलं. ही घटना १६ फेब्रुवारीला घडली. या घटनेत विनयला किरकोळ जखमाही झाल्या आहेत, अशी मीहिती तिहार जेलच्या अधिका-यांनी माध्यमांना दिली.

नवीन डेथ वॉरंट जारी झाल्यापासून विनयचं मनस्वास्थ्य बिघडलं आहे. त्याने त्याच्या आईलाही ओळखलं नाही, असं विनयचे वकील एपी सिंग यांचं म्हणणं आहे. मात्र, जेलमधील अधिकाऱ्यांच्या मते विनयची प्रकृती अगदी व्यवस्थित आहे.

फाशी टळणार?

फाशीची शिक्षा झालेले आरोपी अनेकदा हिंसक वर्तन करु लागतात. अशा परिस्थितीत जर आरोपीला कुठली इजा झाली तर काही काळासाठी फाशी टाळता येते. जर आरोपी जखमी झाला. त्याचं वजन कमी झालं, तर त्याची प्रकृती स्थिर होईपर्यंत फाशी टाळता येते, अशी माहिती जेल अधिकाऱ्यांनी दिली आहे.

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना येत्या ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे. नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी आरोपी मुकेश कुमार सिंह (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय कुमार शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार (वय-३१) यांना फाशी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments