Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रबंगल्यांवरील उधळपट्टीवर दादांचा रेड सिग्नल!

बंगल्यांवरील उधळपट्टीवर दादांचा रेड सिग्नल!

Ajit Pawar Thanks to narendra Modiमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवरील दुरुस्तीच्या कामासाठी वारेमाप खर्चावर नाराजीचा सूर उमटला होता. याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या खर्चात कपात करा. महागड्या वस्तू खरेदी करू नका. कोणत्याही प्रकारे अनाठायी खर्च करू नका, असा सक्त आदेश अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

Maha Vikas Aghadi Letter,Maha Vikas Aghadi, Letter,Maha, Vikas, Aghadi

तब्बल ३१ बंगल्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक बंगल्यावर ८० लाख ते दीड कोटी रुपये खर्च होणार आहे. हा खर्च एकूण १५ कोटींच्या घरात असल्याने त्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. भाजपनेही बंगल्यांवरील उधळपट्टीवर कडक शब्दांत टीका केली होती. मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगल्याची कंत्राटं देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अजित पवारांनी या विभागालाच खर्च आवरण्याचे निर्देश दिले आहेत.

बंगल्याची केवळ संरचनात्मक दुरुस्ती करण्यात यावी...

या बंगल्याची केवळ संरचनात्मक दुरुस्ती करण्यात यावी. त्यात महागड्या वस्तू घेऊ नये. जो खर्च मंजूर करण्यात आला आहे, त्याव्यक्तिरिक्त बंगल्यावर अनाठायी खर्च करू नका. खर्च मर्यादेतच ठेवा, असे निर्देश पवार यांनी १३ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments