Placeholder canvas
Tuesday, May 14, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआमदार सोळंकेंनी ‘या’ कारणामुळे राजीनाम्याचा निर्णय फिरवला

आमदार सोळंकेंनी ‘या’ कारणामुळे राजीनाम्याचा निर्णय फिरवला

Prakash Solankeमुंबई : माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते आज मंगळवारी आमदारकीचा राजीनामा देणार होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोळंके यांचे मनवळविण्यात यश आले. शरद पवारांशी माझी चर्चा झाली. माझे समाधान झाले. मी माझा राजीनाम्याचा निर्णय मागे घेत आहे. असे सोळंके यांनी जाहीर केले.

आज आमदार सोळंके राजीनामा देणार होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सोळंके यांच बोलणं झालं. त्यानंतर सोळंके यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी दिली. यावेळी आमदार सोळंके, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. धनंजय मुंडे उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी सांगितले की. राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके नाराज झाले होते. ते आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती घेण्याच्या तयारीत होते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी मंगळवारी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली.

याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘प्रसारमाध्यमांतून नाराजीची चर्चा समोर आली होती. त्यामुळे आज त्यांना मुंबईला बोलावण्यात आलं. आमची चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादी पक्ष एका कुटुंबाप्रमाणे आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा मान ठेवणं, त्याला काम करण्याची संधी हे पवार साहेबांचं धोरण आहे. आम्ही त्यांच्याशी बोललो. स्वत: शरद पवारही बोलले. त्यातून प्रकाश दादांचं समाधान झालेलं आहे.’

समाधान झाल्यामुळे मी निर्णय मागे घेतला…

‘मंत्रिमंडळ विस्तार झाला. माझी चौथी टर्म होती. त्यामुळे पक्षाने मला न्याय द्यावा अशी माझी भूमिका होती. त्यातूनच मी या निष्कर्षाप्रत आलो होतो की आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घ्यायची. मात्र माझे कार्यकर्ते मला भेटले. घाईगर्दीने निर्णय घेऊ नका असं सांगितलं. पवार साहेबांशीही चर्चा झाली आणि मी माझे समाधान झाले. मी माझा राजीनाम्याचा निर्णय मागे घेत आहे. मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असल्याचे आमदार सोळंके यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले.

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, मी कुणाबद्दल नाराज नाही, मी आमदरकीचा राजीनामा देणार. मला राजकारणाची किळस आली. मी पक्षाशी गद्दारी करणार नाही. मी भविष्यात पक्षासोबतच राहणार असं सोळंके यांनी सांगितलं. माझ्या बद्दल पक्षाने जो निर्णय घेतला त्या बाबत पक्षालाच विचारणे योग्य होईलं. असं सोळंके यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

त्यांच्या बंधूंशी मी बोललो. नाराजी वगैरे राहत असते – अजित पवार

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काही लोकांची नाराजी असते. माझं प्रकाश सोळंके यांच्याशी बोलणं झालं नाही. त्यांच्या बंधुंशी मी बोललो. त्यांची नाराजी दूर करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आता ४३ मंत्र्यांचा जॅम्बो मंत्रिमंडळ तयार झाले आहेत. मात्र, या मंत्रिमंडळाला नाराजांचे विघ्न लागले असून तिन्ही पक्षांमधून नाराजांचा सूर निघत आहे. उध्दव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे विस्तार सोमवारी मोठ्या थाटात झाले. या मंत्रिमंडळ सोहळ्यात नाराज आमदारांना दांडी मारली. आता नाराज आमदारांमधून आणि त्यांच्या समर्थकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे नाराजांची मनधरणी कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments